शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोविडमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

------------------- लसीकरण मोहीम ऑफलाइन करण्याची मागणी नांदूरशिंगोटे : कोरोनावरील लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र काही ...

-------------------

लसीकरण मोहीम ऑफलाइन करण्याची मागणी

नांदूरशिंगोटे : कोरोनावरील लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र काही नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. तसेच ग्रामीण भागात अनेक जणांकडे मोबाइल नसल्याने त्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम ऑफलाइन करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत असल्याचे चित्र आहे.

------------------

लॉकडाऊनमुळे कांदा चाळीत

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे कांदा चाळीत टाकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहेत. यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने कांदा चाळीत टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. तसेच कांद्याचे भाव घसरल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

----------------

मऱ्हळला कोरोना प्रतिबंधक लस

नांदूरशिंगोटे : मऱ्हळ खुर्द येथे पहिल्या टप्प्यात ४५ वर्ष वयाच्या पुढील १०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. ज्येष्ठ, दुर्धर आजाराने पीडित असलेल्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मऱ्हळ उपकेंद्राद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सरपंच सुजाता शिवाजी घुगे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

-----------------

चेक पोस्टवर वाहनांची तपासणी

नांदूरशिंगोटे : राज्य शासनाच्या जिल्हाबंदी आदेशान्वये नांदूरशिंगोटे येथील नाशिक-पुणे महामार्गावर चेक पोस्ट उभारण्यात आला असून, प्रत्येक वाहनाची चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा हद्दीवर चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने जिल्हाबंदीचे आदेश जाहीर केले आहे. पोलीस कर्मचारी, शिक्षक, होमगार्ड आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.