शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल संघटनेचा मंगळवारपासून लॉँग मार्च

By admin | Updated: June 29, 2014 00:53 IST

सिन्नर : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिकरोड ते मुंबई मंत्रालयापर्यंत सोमवार (दि. १) पासून लॉँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

सिन्नर : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिकरोड ते मुंबई मंत्रालयापर्यंत सोमवार (दि. १) पासून लॉँग मार्चचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय धरम व राज्य समन्वयक प्रवीण कर्डक यांनी दिली. राज्यात महसूल विभागात सुमारे १२ हजार ६३७ कोतवाल स्वातंत्र्य पूर्व काळापासून काम करीत आहेत. कोतवालांना दरमहा पाच हजार रुपये मानधन व दहा रुपये चप्पल भत्ता मिळतो. कोतवालांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ५० वर्षांपासून सातत्याने राज्यातील कोतवाल बेमुदत धरणे, आंदोलने, संप व उपोषण करीत आहेत. शासन स्तरावर कोतवालांच्या चतुर्थश्रेणीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. कोतवालांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, निवडणुकीचे कामे व विविध शासकीय योजनांची कामे २४ तास करून घेतली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महसुूलाचा पाय समजला जाणारा कोतवाल आत्तापर्यंत उपाशीपोटी जगत आला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महागाईच्या काळात मुलांचे शिक्षण, निवारा, आजारपण असे अनेक प्रश्न कोतवालांना भेडसावत आहेत. कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करावी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी मंगळवार (दि. १) पासून सकाळी ११ वाजेपासून नाशिकरोड बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून लॉँग मार्चचे (पायी संघर्ष सत्याग्रह) सुरुवात करण्यात येणार आहे. घोटी, कसारा, कल्याण, ठाणे, दादर मार्गे मंत्रालय मुंबई येथे लॉँग मार्च जाणार असून, मागण्या नामंजूर झाल्यास त्याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लॉँग मार्चमध्ये राज्यातून कोतवाल सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)