शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपा आयुक्तांची आदेशावरून कोलांटउडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:02 IST

मालेगाव मध्य : जिल्हा बंदीचे उल्लंघन करीत शहरातील कोवीड सेंटरमध्ये उपचार केल्याप्रकरणी जिल्हा बाह्य व ग्रामीण भागातील रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशामुळे जनतेत पसरलेला रोष व महागठबंधन आघाडीने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांना आपले आदेश मागे घ्यावे लागले.

मालेगाव मध्य : जिल्हा बंदीचे उल्लंघन करीत शहरातील कोवीड सेंटरमध्ये उपचार केल्याप्रकरणी जिल्हा बाह्य व ग्रामीण भागातील रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशामुळे जनतेत पसरलेला रोष व महागठबंधन आघाडीने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांना आपले आदेश मागे घ्यावे लागले.शहरातील फारान हॉस्पिटलमधील कोवीड सेंटरमध्ये संगमनेर, धुळे, येवला व तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्णांनी उपचार घेतले होते. याप्रकरणी कुठल्याही प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेता जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘त्या’ रूग्णांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधी मनपाचे डीसीएचसी केंद्र प्रमुख डॉ. ए. ए. फैजी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसे पत्रच मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी ११ जुलै रोजी काढून संबंधित रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.आयुक्तांच्या या अजब फतव्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. याची दखल घेत आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्यासह महागठबंधन आघाडीने आयुक्तांच्या आदेशाचा निषेध करीत आदेश मागे घेवून जनतेची जाहीर माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला होता.त्यामुळे आयुक्तांनी सोमवारी (दि. २०) एक पत्र काढले असून त्यात जिल्हाबंदी काळात मनपा क्षेत्रात येवून फारान हॉस्पिटल या कोवीड केंद्रामध्ये उपचार करणाºया रूग्णांवर उचित कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन स्वत: सक्षम असल्याने मागील आदेश रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयुक्त कासार यांनी आपल्या ‘त्या’ आदेशावरुन कोलांटउडी घेत कारवाईचा चेंडू पोलीस प्रशासनाकडे टोलावला आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे महागठबंधन आघाडीसह शहरवासियांचे लक्ष लागून आहे.------------------माफीची मागणीमहागठबंधन आघाडीचे नगरसेवक एजाज बेग, मुस्तकीम डिग्निटी, मौलाना अतहर हुसैन अशरफी यांनी आयुक्त त्र्यंबक कासार यांची भेट घेतली. यावेळी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर आयुक्त व उपस्थितांमध्ये शाब्दीक चकमकही उडाली. तथापि दोन दिवसात आपल्या निवेदनाचे लेखी स्वरूपात उत्तर देण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिल्याने अजून दोन दिवस वाट पाहण्याची भूमिका महागठबंधनने घेतल्याची माहिती नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांनी दिली.-------------फारान हॉस्पिटलसह इतर कोवीड केंद्रामध्ये एकूण १२० मनपा क्षेत्राबाहेरील रूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. त्यापैकी फारान हॉस्पिटल वगळता सर्व केंद्र प्रमुखांनी त्याबाबतची माहिती मनपा आयुक्तांना दिली होती. परंतु फारान रूग्णालयाचे प्रमुख डॉ. ए. ए. फैजी कडून या रूग्णांची माहिती मनपा देण्यात आली नाही.- नितीन कापडणीस, मनपा उपायुक्त

टॅग्स :Nashikनाशिक