शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकम हा सदाहरित वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:39 IST

​​​​​​​कोकम हा सदाहरित वृक्ष असून, तो सरळ वाढतो. मात्र याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. या वृक्षाचे नर फुले, मादी फुले एकाच झाडावर असतात. पाने चकाकणारी चवीला थोडी आंबट असतात. भारतात पश्चिम घाटात, कोकणात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये हा वृक्ष आढळून येतो.

ठळक मुद्दे खोकल्यामध्ये कोकमची पाने आणि खडीसाखर चावून खाल्ल्याने आराम पडतो

कुसुम दहिवेलकर कोकम हा सदाहरित वृक्ष असून, तो सरळ वाढतो. मात्र याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. या वृक्षाचे नर फुले, मादी फुले एकाच झाडावर असतात. पाने चकाकणारी चवीला थोडी आंबट असतात. भारतात पश्चिम घाटात, कोकणात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये हा वृक्ष आढळून येतो.महाराष्ट्रात तेलासाठी कोकमची लागवड केली जाते. कोकम वृक्षाला लाल रंगाचे लिंबूएवढे फळ लागते. हे फळ म्हणजेच कोकम होय. फळे पिकल्यावर गर काढून सरबत बनवितात. नंतर उर्वरित सालापासून आमसूल बनविले जाते. बियांपासून तेल काढतात. म्हणून या फळाचा सर्वांग उपयोगात येतो. कोकम वृक्षाचे साल, पाने, फळे औषधात वापरतात. साल जे काम करते तेच काम पाने करतात. म्हणून साल काढू नये. बियांपासून जे तेल काढले जाते ते जाडसर घट्ट रूपात लोण्यासारखे दिसते. हे तेल खाण्यासाठी वापरले जाते. याशिवाय कोकम तेलाचा उपयोग चॉकलेट, मिठाई आणि मेणबत्ती बनविण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. हे तेल जळताना अडचण येत नाही म्हणून मेणबत्तीमध्ये वापरतात. कोकणात याचा मोठा व्यवसाय आहे. कोकम तेल भिरंडेल तेल म्हणून ओळखले जाते. मूळव्याधात अतिप्रमाणात आग होत असेल तेव्हा कोकम तेल लावतात. मूळव्याधीत रक्त येते अशावेळी आमसूल चटणी बनवून ती दह्यात कालवून खाल्ल्याने रक्त येणे थांबते. शिवाय मूळव्याध बरा होण्यास मदत होते. आमसूल पावडर, सेंधव मीठ एकत्र करून जेवणात सेवन केल्याने रुची वाढते. हातापायाचा दाह होत असेल किंवा आग होत असेल तर अशावेळी कोकम तेल चोळावे. हाडांच्या दुखण्यावर कोकमची पाने वाटून गरम करून हाडांवर लेप करावा याने दुखणे थांबतो. अतिप्रमाणात तूप खाल्ल्याने अपचन होते. अशावेळी कोकम सरबत उत्तम काम करते. तूप पचून तूप शौचाद्वारे निघून जाण्यास मदत होते. शीतपित्तावर कोकमचे सरबत जिरे, साखर घालून घ्यावे. पित्तरोगात किंवा आम्लपितात कोकम वेलची पावडर आणि साखरची चटणी बनवून खावी. थंडीत ओठ फाटतात अशावेळी कोकम तेल ओठांवर चोळावे शिवाय हातापायावर भेगा पडल्या तेव्हासुद्धा कोकम तेल लावल्यास भेगा भरून येतात. उन्हाळ्यात सारखी तहान लागते अशावेळी कोकम सरबतचे सेवन करावे. खोकल्यामध्ये कोकमची पाने आणि खडीसाखर चावून खाल्ल्याने आराम पडतो.