मालेगाव : रमजानपुरा भागातील हाजी अहमदपुरा येथे इलेक्ट्रिक दुकानातून दहा-बारा दिवसांपूर्वी विकत घेतलेला फ्रीज खराब झाल्याच्या कारणावरून टोळक्याने संगनमत करून दुकानदारासह त्याच्या मामेभावास लाथाबुक्क्याने व चाकूने वार करून जखमी केले. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. एकबाल अहमद अब्दुल अजीज (२७) यांनी आयेशानगर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या दुकानातून दहा-बारा दिवसापूर्वी एका इसमाने फ्रीज विकत घेतला होता. सदरचा फ्रीज खराब असल्याने दुकानदाराशी वाद घालुन दुकानासमोर फ्रीज घेणाऱ्या ग्राहकाचा भाऊ आतीक मोबीन एकबाल व इतर चार जण यांनी फिर्यादी व त्याचा मामेभाऊ अब्दुल कादीर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर एकाने धारदार चाकूने अब्दुल कादीरच्या उजव्या पायावर वार केला. भांडण सोडविण्यास आलेल्या अब्दुल आहत यांना देखील मारहाण करण्यात आली. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत. (प्रतिनिधी)
दुकानदारावर चाकूने हल्ला; दंगलीचा गुन्हा
By admin | Updated: March 23, 2017 23:18 IST