शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

येवल्याच्या अर्थव्यवस्थेत भर घालत एकोपा जपणारा पतंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:35 IST

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मानव सृष्टीवरील सामूहिक जीवन, खिलाडूवृत्ती व कौटुंबिक ओढ जोपासणारा रोजगाराभिमुख पतंगोत्सव हल्ली अधिकच जोमाने व जोशात साजरा होत आहे. विशेषत: येवल्यात पतंग व आसारी खरेदी-विक्र ी व पतंगाशी संबंधित व्यवसाय बहरले आहेत. परिणामी येवल्याच्या अर्थव्यवस्थेत या उत्सवामुळे भर पडत आहे. लाखो रुपयांची उलाढाल तीन दिवसांत होत असून, अनेक कुटुंबांची चूलही या सणानिमित्त पेटते आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयांची उलाढाल : अनेक बेरोजगारांना रोजगार; आसारी विक्रेत्यांसह हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस

दत्ता महाले ।येवला : मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मानव सृष्टीवरील सामूहिक जीवन, खिलाडूवृत्ती व कौटुंबिक ओढ जोपासणारा रोजगाराभिमुख पतंगोत्सव हल्ली अधिकच जोमाने व जोशात साजरा होत आहे. विशेषत: येवल्यात पतंग व आसारी खरेदी-विक्र ी व पतंगाशी संबंधित व्यवसाय बहरले आहेत. परिणामी येवल्याच्या अर्थव्यवस्थेत या उत्सवामुळे भर पडत आहे. लाखो रुपयांची उलाढाल तीन दिवसांत होत असून, अनेक कुटुंबांची चूलही या सणानिमित्त पेटते आहे.मध्यंतरीच्या काळात पतंगोत्सवात शौकिनांना पतंग उडविण्यासाठी चांगली गुणवत्ता असलेले काठभरीव पतंगदेखील वेळेवर उपलब्ध होत नव्हते. परंतु पुन्हा पंतगोत्सावाकडे, मनोरंजनासह धार्मिक अधिष्ठान, सामाजिक एकोपा, संस्कृती जोपासण्यासह उत्तम रोजगाराभिमुख उत्सव म्हणून पाहिले जात आहे. जानेवारीतील संक्र ांत आटोपली की एप्रिल महिन्यापासूनच येवल्यातील ५० ते ६० कुटुंबे पुढील संक्र ांतीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून पतंग बनवण्याच्या तयारीला लागतात. या पतंगासाठी कमान व दट्ट्या (पतंगाची उभी काडी) शिलण्याचे काम सुरू होते. संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात गर्क होते. पतंगाच्या कमाईवर चरितार्थदेखील चांगल्या प्रकारे चालतो. खास खासियत असलेल्या येवल्याच्या काठभरीव पतंगीला मागणीसह भावही चांगला मिळतो. बुरु ड समाजातील कुटुंबेदेखील बांबूपासून तयार केल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध असाºया तयार करण्याच्या उद्योगापासून चांगल्या प्रकारची कमाई होते. हिरवागार ओला बांबू आसारी तयार करण्यासाठी लागतो. मासी, चेवली, हिरवा ताजा बांबू वापरून चार, आठ, सहा, दहा पाती असाºया तयार केल्या जातात. या आसऱ्यांची किंमत ९० रुपयांपासून २६० रु पयांपर्र्यंत आहे. याशिवाय येवल्याच्या विणकरी व्यवसायासाठी पैठणी तयार करताना रेशीम उकलण्यासाठी आसारी आवश्यक असून, गेल्या १५० ते २०० वर्षांपासून येवल्यात वापरली जाते. त्यामुळे बुरु ड समाजबांधवांना वर्षभर फुरसत नसते. आता स्टीलचे पाइप वापरूनदेखील आसारी तयार करून बाजारातविक्र ीसाठी आणली जात आहे. मांजा तयार करण्यासाठी लागणारी काच पूर्वी खलबत्त्यात कुटली जात असे. आता खलबत्त्याची जागा ग्राइंडरने घेतली आहे.६० रु पये किलोप्रमाणे आयती काच आता उपलब्ध होत आहे. यामुळे गिरणीक्कांडप व्यवसायिकांच्या रोजगारातही भर पडली आहे. जानेवारीच्या दुसºया आठवड्यात काच कांडप व्यवसाय तेजीत असतो. सुरत, बरेली, मुंबई,अहमदाबाद येथून दोºयाची खरेदी नोव्हेंबर महिन्यातच व्यापारी करतात. एका व्यक्तीला किमान ४०० ते ५०० रु पयांचा दोरा पतंग उडवण्यासाठी लागतो. यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणवर होते.भोगी, संक्र ांत व कर या तीन दिवसांत पतंगोत्सवाला उधाण येते. परगावी वा परदेशात असणारी व्यक्तीदेखील आपल्या माहेरी म्हणजे येवला येथे येतात. व्यवसाय व नोकरीनिमित्ताने दूर गेलेले सर्व मित्र कंपनी व कुटुंबातील सदस्य एकत्रित भेटतात.पतंगोत्सवाच्या निमित्ताने महिलादेखील मनमुराद आनंद लुटतात. ध्वनिक्षेपक, हलकडी, बॅण्डच्या तालावर पतंगोत्सवाची मजा घेतली जाते. तसेच घरांच्या छतावर अनेक टेपरेकॉर्डर लावले जातात. पंतग काटली की वकाटचा होणारा जल्लोष काही वेगळीच प्रेरणा देत असतो. रात्रीच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी होत असते. यामुळे फटाका व्यावसायिकांचेही व्यवसाय तेजीत येतात. त्यामुळे सांस्कृतिक आधार, रोजगाराभिमुख पतंगोत्सवाचे धार्मिक महत्त्व व स्नेहभाव जोपासणारा हा सण येवल्याचे अर्थचक्र गतिमान करतो आहे हे मात्र, निश्चित.नाशिक जिल्ह्यातील व्यापारी येवल्यात येऊन पतंगविक्र ीसाठी घेऊन जातात. त्यामुळे संक्र ांत आटोपताच मार्च महिन्यापासून पतंग तयार करण्याचा व्यवसाय सुरू करावा लागतो. या व्यवसायात घरातील प्रत्येक माणूस मदत करतो. त्यामुळे आम्ही पतंगशौकिनांची गरज भागवू शकतो. एवढे करूनही अनेक लोक पतंग न मिळाल्याने नाराजही होतात. पतंगोत्सवात मोठी उलाढाल होत असल्याने व्यवसायाचे समाधान लाभते. - राहुल भावसार, पतंग व्यावसायिकअसे आहेत आसारीचे दरसहा पाती (लहान) - १०० रु पये, सहा पाती (मोठी) - १५० रु पये, आठ पाती (लहान)- २५० रु पये, आठ पाती (मोठी) - ३०० रु पयेपतंगाचे दर (शेकडा)अर्धीचा (पांढरा) पतंग - ४०० रु . अर्धीचा (रंगीत) पतंग - ६०० रु. कटपाउनचा पतंग - ८०० रुपये, पाऊनचा पतंग - १००० रु पये, सव्वाचा पतंग - ३५०० रु पये

टॅग्स :kiteपतंग