आमदार माणिकराव कोकाटे यांनी वडांगळी येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी रुग्णांसोबत चर्चा करून कोविड सेंटरच्या अडचणी समजून घेतल्या. लोकसहभागातून उभे राहिलेले कोविड सेंटर हे आदर्शवत असून, सर्व सुविधायुक्त असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
आमदार कोकाटे यांनी कोविड सेंटरमध्ये असलेल्या औषधांच्या साठ्याची पाहणी करत, फॅबी फ्लू गोळ्यांचा साठा उपलब्ध करून देण्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव यांना सूचना केल्या. आतापर्यंत या सेंटरमध्ये २८ रुग्ण सेंटरमध्ये दाखल झालेले असून, त्यापैकी १० रुग्ण हे पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. दोन रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना जिल्हा उपग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, उर्वरित १६ रुग्ण सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
इन्फो
सुविधांयुक्त कोविड सेंटर
वडांगळी कोविड सेंटरमध्ये कुठल्याही रुग्णाच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास तत्काळ डॉक्टर उपलब्ध असून, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, योगा मार्गदर्शन, कोरोनावरील सर्व औषधे मोफत, ३५ बेडची सुविधा, प्रत्येक वाॅर्डमध्ये वाफेचे मशीन, आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था, रुग्ण अचानक अत्यवस्थ झाल्यास ऑक्सिजनची तात्पुरती व्यवस्था आदी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
फोटो १० वडांगळी कोविड
वडांगळी येथील कोविड सेंटरला आमदार माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली. यावेळी सरपंच योगेश घोटेकर व रुग्ण उपस्थित होते.
===Photopath===
100521\490810nsk_41_10052021_13.jpg
===Caption===
फोटो १० वडांगळी कोवीड वडांगळी येथील कोविड सेंटरला आमदार माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली. त्याप्रसंगी सरपंच योगेश घोटेकर व रुग्ण.