शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

द्वारका चौकात खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:18 IST

नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअपघातांना निमंत्रण । पावसाच्या रिपरिपीने निकृष्ट रस्ते कामाचे पितळ उघडे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृ ष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे झाले आहे. द्वारका चौकातून उड्डाणपूल जातो. यामुळे निम्मा चौक झाकला जातो, तरीदेखील पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. द्वारक ा चौकातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात होत आहेत. तसेच पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन कच, खडी सर्वत्र विखुरली गेली आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खड्डे चुकवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करत द्वारका ओलांडावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने चांगल्यापद्धतीने द्वारका चौकात पडलेले खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.थातूरमातूर काम नकोद्वारका चौकातील खड्डे बुजवितांना महापालिका प्रशासनानेथातूरमातूर पद्धतीने बुजवू नये, असे नागरिकांचे म्हणणे आहे. उगाचच कार्यवाहीचा फार्स दाखवू नये तर दर्जेदार पद्धतीने किमान पावसाळ्यापर्यंत तरी सहजरीत्या ‘द्वारका’ ओलांडता येईल, अशारीतीने खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती या चौकात काही दिवसांनी पुन्हा पहावयास मिळण्याचीशक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सpwdसार्वजनिक बांधकाम विभाग