शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

वीस लाखांच्या खंडणीसाठी नाशकातील युवकाची हत्त्या

By admin | Updated: October 18, 2015 00:08 IST

मालेगाववर शोककळा : त्र्यंबकेश्वरजवळ आढळला मृतदेह

मालेगाव/नाशिक : शिक्षणासाठी गोळे कॉलनीत राहात असलेल्या मालेगावमधील व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे २० लाख रुपयांंच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे़ खून झालेल्या युवकाचे नाव मोहितेश प्रलिन बाविस्कर (१७) असे असून, तो मूळचा मोतीबाग नाका, कलेक्टरपट्टा, मालेगाव येथील रहिवासी आहे़ या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे़मालेगावमधील व्यावसायिक प्रलिन श्यामकांत बाविस्कर यांचा सतरा वर्षीय मुलगा मोहितेश प्रलिन बाविस्कर हा आयआयटी परीक्षेच्या क्लाससाठी नाशिकमधील गोळे कॉलनीतील वसतिगृहात मित्रांसमवेत राहात होता़ बुधवारी (दि़ १४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले़ तर गुरुवारी (दि़ १५) त्याच्या मोबाइलवरून (८८८८७०२७७०) वडील प्रलिन बाविस्कर यांच्या मोबाइलवर (९८२३१८४४८५) फोन करून अज्ञात व्यक्तीने २० लाखांच्या खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास मोहितेशला जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ यानंतर वडील प्रलिन बाविस्कर यांनी गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याची फिर्याद दिली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, मयत मोहितेशचे मित्र-मैत्रिणी, त्याचे कुणाशी वैर, भांडण होते का? याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी (दि़ १६) त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील एका शेताच्या मोरीजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती डी़ आऱ पाटील यांना मिळाली़ त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठविला़ अज्ञात मृतदेहाची चौकशी करण्यासाठी बाविस्कर कुटुंबीयांचे सदस्य गेले असता सदर मृतदेह मोहितेश याचा असल्याचे त्यांनी ओळखले़ घटनेचे वृत्त मालेगाव शहरात समजताच शहर हादरले. मोहितच्या नातलगांनी नाशिककडे धाव घेतली. त्याच्या कलेक्टर पट्टा भागासमोरील घरात कल्लोळ माजला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. तेव्हा आईसह नातलगांनी मोठा हंबरडा फोडला. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. मोहितेशवर सायंकाळी श्रीरामनगर अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.