नाशिक : म्हसरूळ जवळील बोरगड कॉलनी परिसरातील उज्ज्वलनगर येथील सोळा वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि़१) घडली आहे़ सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाते, असे सांगून ही मुलगी घराबाहेर पडली, ती पुन्हा घरी परतलीच नाही़ याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीचे अपहरण
By admin | Updated: October 5, 2016 01:19 IST