वणी : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार झालेल्या युवकास पोलिसांनी गुजरातमध्ये सुरत येथे अटक केली आहे. त्याच्याविरोधात अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर कुटुंबीयांनी त्या मुलीचा शोध घेतला मात्र तिचा मागमूसही आढळून आला नाही. त्या दरम्यान बोपेगाव येथील सुनील सुरेश कावळे (२६) हाही बेपत्ता असल्याने त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची फिर्याद पोलिसात देण्यात आली. अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता दोघे गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याचे पुढे आले.प्राप्त माहितीन्वये सुरत पोलिसांच्या मदतीने वणी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तपासात उघड झाल्याने वैद्यकीय तपासणी अहवालात यास दुजोरा मिळाला.तक्र ारीच्या आधारे अपहरण, बलात्काराचा गुन्हा सुनील सुरेश कावळे विरोधात दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे़
मुलीचे अपहरण; संशयितास अटक
By admin | Updated: August 11, 2016 22:50 IST