स्थापना व इतिहास : वडाळा शिवारातील खोडेनगर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिराची स्थापना २००९-१० मध्ये सुनील खोडे यांनी आपले मातृ-पितृ म्हाळसाबाई व महादू खोडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केली. डीजीपीनगर, अशोका मार्ग व वडाळा परिसरातील हे एकमेव विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची देखभाल-दुरुस्ती व धार्मिक कार्यक्र म विठ्ठल-रुखमाई मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येते. वैशिष्ट्य व परंपरा : खोडेनगर विठ्ठल मंदिराची उंची पायथ्यापासून कळसापर्यंत ७१ फूट आहे. जुन्या पुरातन मंदिराप्रमाणे या मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे. शास्त्रानुसार हे मंदिर १६ खांबांवर उभारण्यात आले आहे. विठ्ठल-रुखमाई यांच्या मूर्ती खास पंढरपूरहून काळ्या पाषाणात बनवून आणण्यात आल्या आहेत. आजचे कार्यक्रम : सत्संग व महाप्रसाद : सकाळी साडेपाच ते साडेसात मंदिरात महापूजा. त्यानंतर उपवासाची खिचडी व केळीचा भाविकांसाठी महाप्रसाद आणि संध्याकाळी प्रवचन होते.
खोडेनगर, वडाळा शिवार
By admin | Updated: July 9, 2014 00:54 IST