शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

खोदा पहाड, निकला चूहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:29 IST

गौणखनिज : खाणींची रॉयल्टी जेमतेम

 नाशिक : तालुक्यातील सारूळ येथे वर्षानुवर्षे खाणींमधून दगडांचा उपसा करून क्रशर चालविणाऱ्यांकडून सहाशे कोटी रुपये रॉयल्टी (स्वामित्वधन) वसूल करण्याचा जिल्हा प्रशासनाचा स्वप्नभंग झाला असून, ज्या खाणींमधून वारेमाप उपसा करून रॉयल्टी बुडविल्याचा आरोप खाणमालकांवर करण्यात आला, प्रत्यक्षात उपशापेक्षा खाणमालकांनी सरकारलाच जादा रक्कम वेळोवेळी अदा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सहाशे कोटी नव्हे, तर जेमतेम पाच-पन्नास कोटीवरच समाधान मानावे लागणार आहे. मार्चअखेरीस शासनाने दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या गौणखनिज उत्खननाविरुद्ध मोहिमेंतर्गत जिल्हा प्रशासनाने खाण मालक व क्रशरचालकांभोवती आर्थिक फास आवळण्यास सुरुवात केली. सारूळ, विल्होळी आदि परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात असलेल्या क्रशरचालकांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना वीज देयकाच्या तुलनेत रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेतला, परंतु क्रशरचालकांनी त्यास विरोध दशविल्याने चिडलेल्या प्रशासनाने प्रत्येक खाणीची सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत व्होलमॅट्रिक पद्धतीने मोजमाप करण्याचे ठरविले. ज्या पाच खाणींचे वाणगी दाखल मोजमाप करण्यात आले, त्यात प्रशासनाला मोठी अनियमितता आढळून आली, परिणामी खाणींमधून दगड उपसा करणाऱ्या क्रशरचालकांनी केलेल्या उत्खननावर रॉयल्टी व त्यावर पाच पट दंडात्मक कारवाईपोटी जिल्ह्याला पाचशे ते सहाशे कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा छातीठोक दावाही करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्यांदाच गौणखनिजातून इतक्या मोठ्या प्रमाणात रॉयल्टी मिळणार असल्याचे पाहून समस्त महसूल यंत्रणा हुरळून गेली व कोटीच्या कोटी उड्डाणे त्यामाध्यमातून मारण्यात आली. या कारवाई संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धीमाध्यमांसमोर मोठ मोठे आकडे जाहीर करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गौणखनिजाचे उत्खनन केले जात असल्याचा अर्थही त्यातून काढण्यात आला, परंतु सारूळ येथील १९ खाणींचे मोजमाप पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाचा बार फुसका ठरला आहे. (प्रतिनिधी)