शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

"खो-खो"ची लवकरच अंतरराष्ट्रीय स्तरावर मजल : शरद पवार

By admin | Updated: May 28, 2017 21:42 IST

सबज्युनियर खो-खो स्पर्धांचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : काही वर्षापूर्वी खो-खो खेळ महाराष्ट्र, गुजरात व इतर काही राज्यांपुरताच मर्यादित असल्याने इतर राज्यांमध्ये या खेळाविषयी फारशी जनजागृती नव्हती. त्यामुळेच या खेळाला संपूर्ण देशभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करून खो-खोचे राष्ट्रीय संघटन तयार करून खो-खो ला देशभरातील सर्व राज्यांमध्ये पोहोचविण्यात यश आले आहे. आता या खेळाला अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणे गरजेचे असून आशिया खंडात खो-खो स्पर्धा होण्यासाठी प्रयत्न सुरू असून खो-खोला खेळ लवकरच अंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.

 

नाशिक जिल्हा खो-खो संघटना आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर झालेल्या २८ व्या राष्ट्रीय सबज्युनियर खो-खो स्पर्धेचे बिक्षस वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय खो-खो संघटनेचे सचिव सुरेश शर्मा, वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार जयंत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, राष्ट्रवादी काँंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदि उपस्थित होते. पवार म्हणाले, नाशिकमध्ये १४ वर्षाखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलयाने येथील खेळांडूना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. अशा स्पर्धांमधूनच भविष्यात उत्कृष्ठ खेळाडू घडतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.