शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खेडगावला ४५, तर गोवर्धन गटात ४३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:32 IST

जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या खेडगाव आणि गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. खेडगाव गटासाठी ४५, तर गोवर्धन गटात केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले.

ठळक मुद्देपोटनिवडणूक : आज होणार मतमोजणी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या खेडगाव आणि गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. खेडगाव गटासाठी ४५, तर गोवर्धन गटात केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले.शुक्रवारी (दि.१३) सकाळी १० वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटाचे सदस्य हिरामण खोसकर आणि दिंडोरीतील खेडगाव गटातून धनराज महाले यांनी निवडणूक लढविल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथील जागा रिक्त असल्याने गुरुवारी या दोन्ही जागांसाठी मतदान घेण्यात आले. खेडगावला ४४.९९ टक्के, तर गोवर्धनला केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठा पणाला लागल्याने या दोन्ही ठिकाणी चांगली चुरस बघायला मिळेल असे वाटत असताना मतदारांमध्ये मात्र फारसा उत्साह दिसून आला नाही. सकाळपासून मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. दुपारनंतर काहीसा वेग वाढला आणि सायंकाळनंतर मतदार केंद्रांवर पोहोचले. या दोन्ही ठिकाणी अनेक केंद्रांवर सायंकाळी ५.३० वाजेनंतरही मतदानप्रक्रिया सुरू होती. गोवर्धन गटासाठी ३६ मतदान केंद्रांवर मतदान झाले़ गटासाठी ३७ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. २२२ कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते.या दोन्ही ठिकाणी होणाºया मतमोजणी केंद्रांसाठी एकूण ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गोवर्धन गटाची मतमोजणी एकूण सहा टेबलांवर होणार आहे, तर खेडगाव गटाची मतमोजणीदेखील सहा टेबलांवर होणार असून दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूकVotingमतदान