शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

खेड गणात चुरशीच्या लढती

By admin | Updated: February 12, 2017 00:07 IST

खेड गणात चुरशीच्या लढती

 लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हेआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत खेड गणात अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. खेड गण अनुसूचित जमाती स्त्री राखीव झाल्याने या गणात महिला राज अवतरणार आहे. या गणात भाजपा, राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना यांच्यात लढत होणार आहे.खेड गणात सुमारे १५५५१ एवढी मतदानसंख्या असून, वासाळी, इंदोरे, खडखेद, परदेशवाडी, खेड, अधरवड, पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव तऱ्हाळे, टाकेद खुर्द, अडसरे खुर्द या गावांचा समावेश आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील खेड गण सिन्नर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने तालुक्यातील नेत्यांबरोबरच सिन्नरच्या आजी-माजी नेत्यांच्या नजरा या गटाकडे वळल्या आहेत.निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले तसे या गणात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क, गाठीभेटी घेऊन मोर्चेबांधणीला सुरु वात केली होती. आतापासूनच मतदारास आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत, तर निवडणुकीत नात्या-गोत्याच्या मतदानाला महत्त्व प्राप्त होणार असल्याने उमेदवारांनी गणातील आपापल्या पाहुण्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.खेड गण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गणातून सिंधूताई वाजे २०८५ मतांनी अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली होती.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पांडुरंग वारुंगसे निवडून आल्यानंतर त्यांनी सव्वा दोन वर्षे उपसभापतिपद भूषिवले. हा गण पंचायत समिती सभापतिपदाचा दावेदार आहे. कारण हा गण सभापतिपदासाठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार राजाभाऊ वाजे यांचा प्रभाव या गणावर राहिला आहे. गणातील सर्वच पक्षांची उमेदवारी निश्चित झाल्याने उमेदवारांच्या गृहभेटींना प्रारंभ झाला आहे.