शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नस्त्यांचा ढिगारा, परिपत्रकांचा ‘खच’

By admin | Updated: July 8, 2017 00:00 IST

नाशिक : जिल्हा परिषदेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात ‘अंतर’ कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात ‘अंतर’ कमी होण्याऐवजी वाढतच असून, मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामकाजाची शिस्त लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना एकीकडे रोज नवनवीन परिपत्रकांचा पाऊस पाडत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडे प्रलंबित नस्त्यांचा ढिगारा वाढतच चालला आहे.दरम्यान, आपले कार्यालय झिरो पेंडसीनुसारच कामकाज करीत असल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्याकडे केला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्वाधिक नस्त्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. निफाड तालुक्यातील शिवापूर गावच्या पाणीपुरवठा योजनेची दुसरा हप्ता निधी देण्याची नस्ती मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाने २६ एप्रिलला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने १६ जूनला मंजूर केलेली असताना अजूनही संबंधित ग्रामपंचायतीस निधी वितरणाचा दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दीपककुमार मीना यांच्या त्यांच्या कक्षात बोलावून घेत शिवापूरसह एकूणच प्रलंबित नस्त्यांबाबत विचारणा केली. काही शिक्षक बदल्यांच्या नस्तीही पडून असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर फाइलींचा निपटारा करा, असे आदेशच शीतल सांगळे यांनी यावेळी दीपककुमार मीना यांना केले. त्यावर आपले कार्यालय झिरो पेन्डसीनुसारच कामकाज करीत असल्याचा दावा त्यांनी केल्याचे समजते.