शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ७४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्‍यात ७४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ...

जळगाव नेऊर : येवला तालुक्‍यात ७४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी

होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक

असलेल्या मका, सोयाबीन, कापूस या पिकांबरोबरच खरीप

हंगामासाठी येवला तालुक्यात ७३ हजार ९३० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागातर्फे पेरणी निश्चित करण्यात

आली आहे. शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीसाठी

लगबग सुरू झाली

असून, कोरोनाने ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले आहे. खते, बियाणांसाठी भांडवलासाठी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी खरीप हंगामावर शेतकऱ्यांची पुढील गणित अवलंबून असल्याने सध्या ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरणी, फनणी, शेणखत पसरविणे तन गोळा करणे या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली आहे.

येवला तालुक्‍यात यंदाच्या खरीप हंगामात ७३ हजार ९३० हेक्‍टरवर खरीप पिकांचे कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून, ३९ हजार १६९ हेक्‍टरवर मका, आठ हजार ९०८ हेक्‍टरवर कापूस, तर ६ हजार ६८२ या मुख्य पिकांच्या पेरणीबरोबर बाजरी, तूर, मूग, भुईमूग, उडीद या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

----------------------

येवला तालुक्यातील खरीप हंगामातील संभाव्य क्षेत्र ॲक्टरमध्ये

बाजरी - ८,७३३,मका - ३९,१६९, तूर - ४४२, मूग - ७,१७३, सोयाबीन - ६,६८२ कापूस - ८,९०८, भुईमूग - २,६३३, उडीद - १९०

अशी एकूण ७३,९३० हेक्टर

---------------

येवला तालुक्यात यावर्षी १२४ गावांमध्ये बाजरी, मका, मूग, सोयाबीन, कापूस, भुईमूग, तूर, उडीद असे एकूण ७,३९३० हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे. या विविध पिकांचे उत्पादनवाढीसाठी बीजप्रक्रिया, बीबीएफनी पेरणी, १० टक्के रासायनिक खताची बचत करणे, जमीन आरोग्यपत्रिकाप्रमाणे खताचा वापर करणे ही मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजना आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राबवाव्यात व आपले उत्पादन वाढण्यास हातभार लावावा.

- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला