शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात

By admin | Updated: May 11, 2017 00:49 IST

नाशिक : कृषी विभागाने खरीप पीक लागवडीचे क्षेत्र वाढविले असले तरी, यंदा नोटाबंदीचा खरीप हंगामावर परिणाम होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत,

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गतवर्षाप्रमाणेच यंदाही मान्सून सरासरी इतकाच बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे कृषी विभागाने खरीप पीक लागवडीचे क्षेत्र वाढविले असले तरी, यंदा नोटाबंदीचा खरीप हंगामावर परिणाम होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत, त्यासाठी एकट्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या आर्थिक संकटाचे कारण पुढे करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णात १०२ टक्के पाऊस झाल्याने खरिपाचे अमाप पीक आले, शिवाय जिल्हा बॅँकेने जवळपास २७०० कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केल्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. परिणामी खरिपाची लागवड ६६२१९३ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. सरासरीपेक्षा १०१ टक्के ही लागवड झाल्याने खरिपाच्या ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली. यंदाही मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने अगोदर व्यक्त केला होता, नंतर मात्र मान्सून सरासरी राहील, असे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी खात्यानेदेखील हवामान खात्याचा अंदाज गृहीत धरून यंदा जिल्ह्णात खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. साधारणत: ६८६०८० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे पीक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, खरीप घेण्यासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या पीक कर्जाबाबत यंदा अनिश्चितता आहे. कृषी खात्याने २८०६ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविले आहे व त्यात सर्वाधिक भार जिल्हा बॅँकेवर टाकण्यात आला आहे. मान्सून तोंडावर म्हणजेच महिन्यावर येऊन ठेपलेला असताना शेतकऱ्यांची खरिपाची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणे, औषधे खरेदीसाठी आत्ताच पैशांची गरज भासू लागली आहे. पीककर्जाच्या करण्यात आलेल्या नियोजनापैकी मे महिन्यात जेमतेम ५० कोटी रुपयांचेच वाटप शेतकऱ्यांना पीककर्जापोटी झाले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास यंदा अस्मानी मेहेरबानी असूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.