शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खरवळ आरोग्य उपकेंद्र ‘लॉकडाऊन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:35 IST

एकीकडे कोरोना महामारीत देवदूत बनलेल्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील आरोग्य उपकेंद्राचे दारच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेऊन आरोग्यसेवा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडून दुर्लक्ष

वेळुंजे : एकीकडे कोरोना महामारीत देवदूत बनलेल्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील आरोग्य उपकेंद्राचे दारच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेऊन आरोग्यसेवा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.राज्यात मालेगावनंतर नाशिक कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. नाशिक जिल्ह्यातही काही भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू संसर्गाने प्रहार केला आहे.आरोग्य यंत्रणा डोळ्यात तेल घालून सक्रि यता बजावते आहे. यामुळे प्रशासनकडून दखल घेण्याची मागणी भागवत हिलीम,चंदर शेवरे, यशवंत शेवरे, उत्तम मौळे, सुभाष मौळे, मनोहर हिलीम, चंदर गावित आदींनी केली आहे.आरोग्यवर्धिनी असलेल्या या उपकेंद्राचे दरवाजे कधी उघडणार? कामचुकार आणि मुख्यालयी न राहणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या उपकेंद्रांना नेमणूक केलेले अधिकारी कुठेआहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तालुका प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच आरोग्यवर्धिनी असलेल्या आरोग्य उपकेंद्राची पाहणी करून नेमलेल्या उपकेंद्र समितीशी संवाद साधायला हवा. उपकेंद्राच्या समस्या जाणून घेत त्यावर कारवाई व्हायला हवी.- मनोहर हिलीम, रहिवासी, खरवळ

हरसूलसारख्या ग्रामीण शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. यामुळे हाकेच्याअंतरावरील खरवळ येथील आरोग्यवर्धिनीतील कर्मचाºयांच्या उदासीनतेमुळे केंद्र बंद अवस्थेत आहे. यामुळे लाखो रु पयांचे आरोग्य उपकेंद्र बांधून कर्मचाºयांच्या अनुपिस्थतीमुळे शोभेचे बाहुले बनले आहे. तसेच परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.- सुभाष मौळे, रहिवासी, खरवळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल