शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खानगाव रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:22 IST

खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देडांबरीकरण करण्याची मागणी : दहा वर्षांपासून रस्त्यावर खड्डे

निफाड : खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याबाबत मागणी होत असताना कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. खानगाव थडी ते ब्राह्मणवाडे यादरम्यान तारू खेडले, तामसवाडी, करंजी ही गावे येतात. या नऊ किलोमीटर अंतराच्या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेही वाहनधारकांना कळेनासे झाले आहे. या रस्त्यावरून वाहने चालवितांना जीव मुठीत धरून चालवावी लागतात. शिवाय या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून, वाहन चालविणे अत्यंत धोकादायक ठरले आहे. विशेष म्हणजे तारू खेडले ते ब्राह्मणवाडे या दरम्यानच्या रस्त्यावर जवळजवळ चाळीस ते पन्नास ठिकाणी नाल्या पडलेल्या आहे. या नाल्यातून वाहन जाताना वाहने आपटल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड होऊन बसले आहे. या खड्ड्यामुळे वाहनांची सुद्धा वाट लागली असून, वाहने वारंवार दुरुस्त करावी लागतात. थोडक्यात सदरचे खड्डे आणि नाले पार करताना डोंगरदऱ्यातील दुर्गम भागातून जातो की काय अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. ब्राह्मणवाडे करंजी, तामसवाडी, तारू खेडले येथील शेतकऱ्यांना नागरिकांना सायखेडा आणि निफाड येथे विविध कामांसाठी जावे लागते, परंतु या खड्ड्यांमुळे येण्या जाण्यातच भरपूर वेळ या नागरिकांचा जात असतो आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्यावरून सायखेडा, निफाड, पिंपळगावबसवंत, विंचूर मार्केटसाठी शेतकरी कांद्याचे ट्रॅक्टर नेत असतात. परंतु प्रचंड खड्ड्यांमुळे हे कांद्याचे ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होते. त्यामुळे मार्केटला पोहोचण्यास उशीर होत असतो.तारू खेडले तामसवाडी करंजी, ब्राह्मणवाडे, हा परिसर बिबट्याप्रवण नसल्याने रात्रीच्या अंधारात हळुवारपणे वाहने चालविताना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. या रस्त्याची दहा वर्षांत साधी डागडुजी सुद्धा झाली नाही. त्यामुळे गोदाकाठच्या या नागरिकांनी या रस्त्याबाबत प्रचंड हाल सोसले त्यामुळे २० वर्षांपासून या भागातील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. या रस्त्याची अशी दुरवस्था गेल्या दहा वर्षांपासून आहे. आता तरी या रस्त्याचे डांबरीकरण करून आमच्यावरचा वनवास व अन्याय थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तामसवाडी ते करंजी यादरम्यान कासारी नाला असून,पावसाळ्यात या नाल्यात पाणी साचल्याने असल्याने ब्राह्मणवाडे, करंजी या गावातील नागरिकांना सायखेडा, निफाडकडे येणे मुश्किल होते. मागील वर्षी या नाल्यात पाणी साचल्याने वाहतूक बंद झाल्याने करंजी येथून मांजरगाव शाळेसाठी येणाºया विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. त्यामुळे आम्ही दुर्गम भागात राहतो की काय असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. या नाल्यावर छोटा पूल बांधावा, अशी या नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा