शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव जंगलातील ‘खैर’ तस्कर टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:30 IST

तस्करीसाठी मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील सुमारे २२५ एकरवर पसरलेल्या जंगलात खैर वृक्षांची कत्तल करणाºया तस्कर टोळीचा छडा नाशिक वन कार्यालयातील गस्त पथकाने लावला.

नाशिक : तस्करीसाठी मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील सुमारे २२५ एकरवर पसरलेल्या जंगलात खैर वृक्षांची कत्तल करणाºया तस्कर टोळीचा छडा नाशिक वन कार्यालयातील गस्त पथकाने लावला.गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाच्या मालकाच्या मुसक्या पिंपळनेर येथून आवळल्यानंतर टोळीतील स्थानिक गुन्हेगारांसह त्यांना अभय देणाºया वनअधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. संबंधित वन कर्मचाºयांकडून पथकाला योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे बोलले जात असून, जंगलाच्या परिसरातील गावांमधील संशयितांचा बचाव स्थानिक वन कर्मचाºयांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.चिंचवे, पोहाणे, गाळणा पंचक्रोशीच्या शिवारात असलेल्या २२५ एकरवर असलेल्या जंगलामधील चारशेहून अधिक खैर वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने १० आॅक्टोबर रोजी उघडकीस आणून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. यानंतर नाशिकचे मुख्य वनसंरक्षक एस. रामाराव यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत स्वतंत्र पथकाची नियुक्ती करून चौकशी सुरू केली. पंचनामा अहवालानंतर रामाराव यांनी वनविभागाच्या मालेगाव उपविभागातील सात वनकर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित करत त्यांना या कत्तलीप्रकरणी जबाबदार धरले असून, कार्यालयीन चौकशी सुरू केली आहे.  दरम्यान, तपास पथकाला मालेगाव तालुक्यात खैर तस्करीचे धागेदोरे शोधण्यास यश आले आहे. उंबरपाड्यातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह मालक बाबुलाल राऊत याला पथकाने ताब्यात घेतले असून, न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.  दरम्यान तस्कर टोळीची धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.‘त्या’ कर्मचाºयांचे धाबे दणाणलेखैर तस्कर टोळीवर मेहेरनजर दाखविणाºया संशयित वन कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. मुख्य वन संरक्षकांकडून सात कर्मचाºयांची चौकशी सुरू करण्यात आली असून, टोळीतील एक ‘मासा’ गळाला लागल्यामुळे त्याच्याकडून कोठडीदरम्यान अन्य संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या वन कर्मचाºयांनी या प्रकरणात आपले हात काळे केले त्यांचे धाबे दणाणले आहे.वाहन एक क्रमांक अनेकखैर तस्करीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांपैकी महिंद्र मॅक्स जीप (एमएच १८, डब्ल्यू ३३४५) वनविभागाने जप्त केली आहे. या वाहनाचा महाराष्टÑातील अस्सल नोंदणी क्रमांक प्रादेशिक परिवहन विभागात असा असला तरी या वाहनाला गुजरातमध्ये जाण्यासाठी महाराष्टÑाची सीमा सोडताना तस्करांकडून (जीजे ०१, डब्ल्यू ३३४५) अशा प्रकारे अदला-बदल केली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या अजून चार वाहनांचा शोध घेतला जात आहे; मात्र त्या वाहनांच्या क्रमांकामध्येही तफावत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.