शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

केसरी किताब वादाच्या आखाड्यात

By admin | Updated: May 5, 2017 13:51 IST

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी व अखिल भारतीय शैली महाकुस्ती संघ आयोजित हिंद केसरी या स्पर्धांपुरताच

नाशिक :महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने २०१४ या वर्षात अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वेळी केसरी किताब हा केवळ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी व अखिल भारतीय शैली महाकुस्ती संघ आयोजित हिंद केसरी या स्पर्धांपुरताच मर्यादीत असल्याचे स्पष्ट करीत अन्य कोणत्याही खासगी व शासकीय संस्थांनी तथा गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील संघटनांनी तसेच यात्रोत्सोव कुस्ती मंडळांनी ‘केसरी’ विशेषण वापरुन स्पर्धांचे आयोजन करून नये. अन्यथा महाराष्ट्र कुस्तीगीर परीषदेतर्फे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर २०१५ व २०१६ या वर्षांमध्ये तालुका व जिल्हा पातळीवरील विविध संघटनांनी परिषदेच्या सूचनांचे पालन करून अशाप्रकारे केसरी विशेषणाचा वापर थांबवला आहे. मात्र चालुवर्षात महाराष्ट्र कामगार मंडळातर्फे कामगार केसरी व विदर्भ कुस्ती संघटनेने विदर्भ केसरी असा किताब जाहीर करून स्पर्धा घेत परिषदेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नाशिक शहर तालिम संघातर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे कुस्तीगीरांच्या आखाडयात आता केसरी किताबाचा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी नाशिक शहर तालिम संघाने जिल्हाभरातील पहिलवान तसेच कुस्ती स्पर्धा आयोजक मंडळांना केसरी विशेषण वापरून स्पर्धा आयोजित करून नये, अशा सूचना केल्या आहेत. अनाधिकृत केसरी विशेषण असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिलवानांना महाराष्ट्र केसरी तथा हिंद केसरी स्पर्धांसह महाष्ट्र कुस्तीगीर परिषद व अखिल भारतीय शैली महाकुस्ती संघ यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिलवानांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याप्रकरणी कामकार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता कामगार केसरी चषकाविषयीचे नियोजन मध्यवर्ती कार्यालयातून होत असल्याचे सांगत प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न संबंधीत अधिकाऱ्यांनी दिला. मात्र कामगार मंडळाच्या या भूमिकेमुळे कामगार चषक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिलवानांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने महाराष्ट्राचा व देशाचा गौरव वाढविणारा केसरी किताब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (प्रतिनिधी)खुराकासाठी अमाप खर्च पहिलवानांना खुराकासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. यातील मोठा भाग स्थानिक पातळ््यांवरील कुस्ती स्पर्धांच्या बक्षीसांतून मिळणाऱ्या रक्कमेतून भागविण्याचा पहिलावानांचा प्रयत्न असतो. मात्र अशाप्रकारे स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यावर बंदणे घातली तर पहिलवानांची आर्थिक कोंडी होण्याची भीती एका नवोदीत पहिलवानाने व्यक्त केली.केसरी किताबाचीच दंगल रंगण्याचे संकेत दिसून येत आहेत.कोणताही मल्ल यापुढे स्थानिक खोट्या केसरीसाठी खेळेत अथवा अशा किताबाचा पट्टा गळ््यात घालेन त्या पहिलावानव संबंधीत संस्थेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा शहर तालिम संघाच्या कडक कारवाईचा सामना करावा लागेल. -हिरामण वाघ, अध्यक्ष, नाशिक (जिल्हा) तालिम संघ