शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाऊसाअभावी पिके लागली कोमेजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 20:45 IST

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .

ठळक मुद्देखामखेडा : शेतकरी चिंतातुर; दुबार पेरणी ओढावण्याची भिती

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .कारण पिकाची उगवण झाल्यानंतर थोडेसे पीक मोठी झाल्यावर पिकाचे मुळ खोलवर अठरा इंच पर्यत जातात. परंतु या अल्पशा पाऊसाने जमिनीचा ओलावा सह इंच होता. त्यावर शेतकºयाने पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकºयाने महागडी बियाणे घेऊन पिकाची पेरणी केली आहे.काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. पिके थोडी मोठी झाल्याने त्याची पाण्याची भूक वाढली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून, पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जूलै महिन्याच्या पंधरा दिवसाहून अधिक कालावधी होत आला आहे. परंतु या पंधरा दिवसामघ्ये एकदाही दमदार पाऊस झाला नाही.पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप निट पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात शेवटी झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे.पाऊस नाही व उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे.पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? अशी भिती आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे.