शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महागडे इंजेक्शन न घेताही केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:50 IST

नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शन दिले, पण रुग्णाची स्थिती काही सुधारेना डॉक्टरांनी टॉसिलिझमब (टुझी) इंजेक्शनचा पर्याय सुचविला नातेवाइकांनी नाशिक, पुणे, नगर, मुंबई आदी ठिकाणी शोध घेतला, पण इंजेक्शन मिळाले नाही. याच दरम्यान ॲलोपॅथीला होमिओपॅथी औषधांचीही जोड देण्यात आली. आज रुग्ण पूर्णपणे बरा होऊन निगेटिव्ह रिपोर्टसह घरी पोहोचला आहे. ही कहाणी आहे त्र्यंबकेश्वर येथील वसीम अत्तार यांची !

ठळक मुद्देरुग्णांच्या नातेवाइकांनी सर्व सूचनांचे पालन केले

नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शन दिले, पण रुग्णाची स्थिती काही सुधारेना डॉक्टरांनी टॉसिलिझमब (टुझी) इंजेक्शनचा पर्याय सुचविला नातेवाइकांनी नाशिक, पुणे, नगर, मुंबई आदी ठिकाणी शोध घेतला, पण इंजेक्शन मिळाले नाही. याच दरम्यान ॲलोपॅथीला होमिओपॅथी औषधांचीही जोड देण्यात आली. आज रुग्ण पूर्णपणे बरा होऊन निगेटिव्ह रिपोर्टसह घरी पोहोचला आहे. ही कहाणी आहे त्र्यंबकेश्वर येथील वसीम अत्तार यांची !३८ वर्षीय वसीम यांना सुरुवातीला ताप येऊ लागला त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार केले, पण फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी नाशिकला येऊन तपासणी केली त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एचआरसीटी स्कोर १२ पर्यंत होता. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शनचे डोसही दिले, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती अधिकच बिघडत असल्याने डॉक्टरांनी त्यांंच्या नातेवाइकांना टॉसिलिझमब हे इंजेक्शन देण्याचा पर्याय सुचविला, पण शेजाऱ्यांचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांच्या नातेवाइकांचे मन यासाठी धजावले नाही, पण तरीही मिळाले तर देऊ म्हणून इंजेक्शनचा सर्वत्र शोध घेतला, पण कुठेही ते मिळाले नाही.

रुग्णाची स्थिती गंभीर होत असताना वसीम यांच्या पुण्याच्या बहिणीने नाशिक शहरातील एका होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सुचविले. लहान बंधू मोईन अत्तार यांनी संबंधित डाक्टरांशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण स्थिती सांगितली. सुरुवातीला त्या डॉक्टरांनी साबुदाण्यासारख्या गोळ्या दिल्या, पण त्या गोड लागत असल्याने रुग्णास ठसका येत असल्याचे जाणवले, त्यानंतर त्यांनी औषधात बदल करून पातळ औषध दिले.

रुग्णांच्या नातेवाइकांनी सर्व सूचनांचे पालन केले आणि दोन दिवसांनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसू लागले. आज वसीम अत्तार पूर्णपणे बरे झाले असून, निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन घरी पोहोचले आहेत. ॲलोपॅथीला होमिओपॅथी औषधांची जोड मिळाल्याने महागडे इंजेक्शन न घेताही कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल