शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

भगव्याची विजयी घोडदौड कायम ठेवा! : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:42 IST

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी विजय संपादन केल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. ३०) मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

येवला : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी विजय संपादन केल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. ३०) मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, विजयाची परंपरा यापुढेही कायम ठेवा, संघटन वाढवा व येत्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी एकदिलाने काम करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.  यावेळी दराडे यांच्या नियोजनबद्ध निवडणूक लढविण्याच्या पद्धतीला ठाकरे यांनी दाद देत कौतुक केले. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी किशोर दराडे यांचे औक्षण करून मातोश्रीवर फक्त मंत्र्यांचेच औक्षण केले आहे, तुम्ही पहिले आमदार असल्याचेही त्या म्हणाल्या.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी किशोर दराडेंना पेढा भरवत भगवी शाल देऊन सत्कार केला. दराडेंसह राज्यमंत्री दादा भुसे व टीडीएफचे नेते संभाजी पाटील यांचाही सत्कार केला. या प्रसंगी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, संभाजीराजे पवार, महेश बडवे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, शिक्षक सेनेचे नेते संजय चव्हाण, शेट्ये, वाघ आदी उपस्थित होते.पाचवा भाऊ करून घ्या !यावेळी निवडणुकीच्या गप्पा मारताना ठाकरे यांनी किशोर दराडेंना आपण किती भाऊ आहेत हा प्रश्न केला. यावर दराडे यांनी चार भाऊ असल्याचे सांगताच ठाकरे यांनी मलाही पाचवा भाऊ करून घ्या म्हणजे सेनेला चांगले दिवस येतील, असे म्हणत विनोद केला. ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत एकत्रित बसून फोटोसेशनदेखील केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना