शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गडकिल्ल्यांचा ठेवा जतन व्हावा

By admin | Updated: February 19, 2017 00:41 IST

दुर्गप्रेमींची धडपड : पुरातत्त्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

नाशिक : एकेकाळी ज्या भूमीवर शिवरायांनी लढाया केल्या त्या नाशिक जिल्ह्यात पुरातत्त्व खात्याकडे कागदोपत्री नोंद असलेल्या गडकिल्ल्याची संख्या ६० पेक्षा जास्त आहे. याशिवाय अन्य डझनभर गडकिल्ले अस्तित्वहीन झाली असून, अज्ञात असल्यासारखीच आहेत. यासर्वच पाऊणशे किल्ल्यांची दुरवस्था झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा यासाठी नाशिकमधील दुर्गप्रेमीं तरुण मंडळी धडपड करत आहेत.  सह्याद्रीच्या डोंगर रांगामधील सालबर्डी आणि सातमाळ या उपरांगाच्या भूप्रदेशात शिवकालीन अनेक जुनी मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ले असून, त्याकडे पुरातत्त्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासंबंधी जिल्ह्यातील अनेक दुर्गप्रेमी तरुण मंडळी आणि सेवाभावी संस्था पाठपुरावा करून हा ऐतिहासिक ठेवा जतन राहावा यासाठी पुरातत्त्व खात्याकडे तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडे वारंवार निवेदन देत असूनही कुठलीही हालचाल होत नाही. त्यामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी स्वत: पुढाकार घेत एकत्र येऊन गडकिल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही तरुण मंडळी प्रत्येक महिन्याच्या रविवारी किंवा सुटीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील एका किल्ल्यावर जाऊन श्रमदान करून गडकिल्ल्यांचा परिसर स्वच्छ करतात. आतापर्यंत रामशेज, साल्हेर, मुल्हेर, चांदवड, धोडप आदि किल्ल्यांवरही मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी टाकलेले प्लॉस्टिक कॅरीबॅग, कागद, कचरा गोळा करतात. तसेच गडकिल्ल्यांवर तलाव, पाण्याचे टाके असल्यास तेथील गाळ व माती काढतात अशी माहिती शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संयोजक योगेश कापसे आणि डॉ. अजय कापडणीस यांनी दिली.