शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘आळंदी’चे पाणी शेतीसाठीच राखीव ठेवा

By admin | Updated: October 19, 2015 23:51 IST

देवीदास पिंगळे : सेंट्रल गोदावरीचे निवेदन

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय चुकीचा असून, कोणत्याही धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्यात येऊ नये, अशी मागणी सेंट्रल कृषक गोेदावरी सहकारी बॅँकेच्या संचालकांनी केली. तर आळंदी धरणातील पाणी शेतीसाठीच राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.माजी खासदार देवीदास पिंगळे व सेंट्रल गोदावरी कृषक सेवक संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आळंदी धरणालगत बहुतांश शेतकऱ्यांच्या फळबागा असून, शेतकऱ्यांना फळबागेसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे आळंदी धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी राखीव न ठेवल्यास फळबागा उद्ध्वस्त होतील. त्यामुळे आळंदी धरणातील पाणी शेतीसाठी व जनावरांच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केली आहे.तसेच सेंट्रल कृषक गोेदावरी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिनकर पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्णात कमी पाऊस झालेला असल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसताना जायकवाडी धरणाला पाणी सोडल्यास जिल्ह्णातील पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी पाण्याची परिस्थिती वाईट होऊ शकते. आळंदी धरणातील पाणी शेतीसाठीच राखीव ठेवण्यात यावे, पाण्यावरून संघर्ष टाळण्यासाठी सरकारने राष्ट्रीय नद्या जोड प्रकल्प राबवावा, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष हिरामण बेंडकुळी, मधुकर खांडबहाले, रामदास चव्हाण, पुंजाराम थेटे, तानाजी पिंगळे, अनिल काकड, रामदास पिंगळे, संदीप पाटील, निवृत्ती शिंदे, अमोल पाटील, पंडित कातड, ज्ञानेश्वर वाघ, शंकर डबले, मोतीराम गायकर, पंडित गायकर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)