शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत कौशल मोराणकर नाशकात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:20 IST

नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला ...

नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. या परीक्षेत नाशकातून कौशल मोराणकर याने खुल्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यात बाराव्या स्थानावर मजल मारली आहे. जिल्ह्यात ओबीसी गटातून अथर्व पवार, एससीतून ओजस सावकारे यांनी अ‌‌‌‌‌व्वल स्थान पटकावले आहे.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे. या हेतूने दहावीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातून खुल्या गटात वेदांत घुगे, आर्या जोशी, अभिजित राठोड, यश बिन्नर, सौरभ नाणकर, अभिषेक गुप्ता, आगम कासलीवाल, सारा अहिरे, तनिषा हासे, सानिका सैंदाणे आदींनी यश संपादन केले. ओबीसी गटातून अथर्व पवार याने प्रथम क्रमांक पटकावला असून, सिद्धी गुंजाळ, वेदांत विसपुते, प्रथमेश बोरसे, उत्कर्ष बागड, वेदांत माळोदे, अथर्व दुबे, विनीत हिरे, ललित सोनवणे, ॲनी रिषी, मिहीर वाणी, अनिकेत शेवाळे, दर्शन ठाकरे यांनी यश संपादन केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून निहल मेहरोलियाने प्रथम क्रमांक पटकावला असून, ओजस सावकारे, ओम नुनसे, प्राजक्ता वाघ, आयुष्का कांबळे, राज सिलावत आदींनी तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून वैभव जगताप यांनी यश संपादन करीत राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परीक्षेत आपले स्थान निश्चित केले आहे.