शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्याच्या युवकाची उपनगरजवळ हत्या

By admin | Updated: May 26, 2017 00:37 IST

नाशिकरोड : उपनगर-जेलरोड कॅनॉल रस्त्यालगत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मोटारी व दुचाकीवरून येत हर्ष सोसायटीच्या वाहनतळामध्ये गोळीबार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : उपनगर-जेलरोड कॅनॉल रस्त्यालगत असलेल्या मंगलमूर्तीनगर परिसरात भरदुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मोटारी व दुचाकीवरून येत हर्ष सोसायटीच्या वाहनतळामध्ये गोळीबार केला. यावेळी वाहनतळात बसलेल्या तुषार भास्कर साबळे (१६) या मुलावर धारधार शस्त्राने हल्ला चढवून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२५) उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगलमूर्तीनगर मधील हर्ष अपार्टमेंट, जय प्रभाकर अपार्टमेंट, जयश्री निवास अपार्टमेंटसह अशा पाच ते सहा अपार्टमेंटचा हा संपूर्ण परिसर आहे. चारही बाजूंनी रहिवासी अपार्टमेंट असलेल्या या परिसरात येण्यासाठी दोन रस्ते आहेत. या रस्त्यांवरून हल्लेखोरांनी तीन मोटारी व दोन ते तीन दुचाकींवरून चेहऱ्याला रुमाल बांधून प्रवेश केला. यावेळी हर्ष अपार्टमेंटच्या वाहनतळातून घरात जाणारे अक्षय जाधव व तुषार यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. हवेत गोळ्या झाडल्यामुळे दोघांनी पळ काढण्यास सुरुवात केली, यावेळी अक्षय जिन्याने व तुषार अपार्टमेंटच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत पळाला; मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून तुषारला गाठले, तर काहींनी अपार्टमेंटच्या अन्य घरांची दरवाजे बाहेरून बंद करून घेतले. हल्लेखोरांनी तुषारवर धारधार शस्त्राने मोकळ्या जागेत पाठीवर, मानेवर वार करून जबर जखमी केले. या हल्ल्यात तुषारचा मृत्यू झाला. आरडाओरड व पळापळ झाल्यामुळे आजूबाजूंचे रहिवासी बाल्कनी व खिडक्यांमध्ये आले; मात्र हल्लेखारोंनी हवेत गोळ्या झाडल्याने सर्व अपार्टमेंटच्या परिसरात सन्नाटा पसरला आणि नागरिक भीतीपोटी पुन्हा घरात गेले. यामुळे हल्लेखोरांना या अपार्टमेंटच्या परिसरातून तुषारच्या हत्येनंतर सहज पळ काढता आला. हल्लेखारांची वाहने मोकळ्या मैदानातून उपनगर कॅनॉलरोडच्या झोपडपट्टीमार्गे गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शी रहिवाशांनी सांगितले.