शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:38 IST

नाशिक :विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा दिला होता.भारतीय कम्युनिष्ट पक्षाने बुधवारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली, त्यापार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कर्जमुक्ती झालीच पाहिजे, समृद्धी महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सातभर चाललेल्या या आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून सातबारा उतारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश्ीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के शेतमालाला भाव द्या, कसत असलेल्या वनजमिनी नावांवर करा, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी येथील वनदावे त्वरीत मंजुर करा, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, राज्य व केंद्र सरकारने हमी भाव देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा किंमत स्थिरता व मदत निधी उभा करावा, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फसवी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. राज्यभर सुकाणू समितीने सरसकट कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाची दखल घ्यावी, पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकरी, उपसा जलसिंचन बंद पडलेल्या आळंदी उपसा जलसिंचन संस्था वाडगाव यांचे कर्ज माफ करा, समृद्धी महामार्गासाठी बागायती व पिकाऊ जमिनी घेऊ नये, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीजबिल माफ करा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी स्वत:हून स्वत:ला अटक करून घेतली. यावेळी पोलिसांनी ३४३ आंदोलकांना अटक करून दुपारनंतर सोडून दिले. या आंदोलनात कॉ. राजू देसले, कॉ. भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, संजय बैरागी, किरण डावखर, नामदेव बोराडे, राजपाल शिंदे, साधना गायकवाड, सोमनाथ वाघ, रावसाहेब हारक, प्रकाश भालके, रतन गायधनी, ज्योती नटराजन, विमल पोरजे, मधुकर कसबे, दत्तात्रय गांगुर्डे, मीना आढाव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले.छावणीचे स्वरूपदोन दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या महापालिकेत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन होत असल्याने पोलिसांनी सकाळी नऊ वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला सशस्त्र वेढा दिला. कार्यालयाच्या बाहेर तसेच आवारात जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तिन्ही प्रवेशद्वार बंद करून घेऊन विचारपूस करूनच अभ्यागतांना सोडण्यात येत होते. अगदी आंदोलकांना अटक केल्यानंतरही सायंकाळपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.