शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कपिलधारा तीर्थक्षेत्र शाहीस्नानासाठी सज्ज

By admin | Updated: September 5, 2015 22:13 IST

तीनही आखाड्यांची प्रमुख उपस्थिती : भाविकांसाठी पार्किंगची सोय

घोटी : इगतपुरी तालुक्यातील सिंहस्थाचे मूळ स्थान असलेल्या श्री तीर्थक्षेत्र कपिलधारा कावनईचे शाहीस्नान रविवारी (दि.६) सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती कावनईचे महंत महंत फलाहारी महाराज यांनी दिली. जगद्गुरु रामानंदचार्य आखाडा परिषद आणि तीनही आनी आखाड्यांच्या प्रमुख उपस्थित हे शाहीस्नान होणार असून, यावेळी प्रमुख महंत म्हणून आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्र महाराज हे उपस्थित राहणार आहेत. या पर्वणी शाहीस्नानासाठी प्रशासन सज्ज झाले असून, भाविकांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पर्वणीस जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य श्री हंसदेवचार्यजी महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, महंत माधवचार्यजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे महंत क्रि ष्णदासजी महाराज, तसेच महंत रामकिशोरदासजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बबन घोलप, गुलाब पाटील, उल्हासदादा पवार, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार निर्मला गावित, देवयानी फरांदे, योगेश घोलप, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, बाळासाहेब सानप आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, आज कपिलधारा तीर्थ परिसराच्या कामाची आणि संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी घेतला. त्यांनी तीर्थक्षेत्राची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, उपअधीक्षक प्रशांत मोहिते, उपविभागीय अधीक्षक छगण देवराज, तहसीलदार महेंद्र पवार आदिंनी महंत रामनारायणदास फलाहारी महाराज, कुलदीप चौधरी, पोपट टाटिया, मगन पटेल, सोमनाथ सूर्यवंशी आदिंशी चर्चा केली.