चांदवड : चांदवड पंचायत समितीच्या कानमंडाळे गणात शिवसेनेचे साहेबराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.दादाभाऊ अहिरे यांची जिल्हा परिषद कानमंडाळे गटाच्या सदस्यपदी निवड झाल्याने कानमंडाळे गणाची जागा रिक्त होती. यासाठी पवार व राष्ट्रवादीचे रामनाथ निरभवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात निरभवणे यांनी माघार घेतल्याने पवार यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्त पवार यांचा सत्कार आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते विश्रामगृहावर करण्यात आला. यावेळी चांंदवड बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, तालुकाप्रमुख नितीन अहेर, का.भा. अहेर, उपतालुकाप्रमुख राजकुमार संकलेचा, विलास ढोमसे, डॉ. राजेद्र दवंडे, सुनील शेलार, जगन्नाथ राऊत, अशोक भोसले, प्रसाद प्रजापत, युवराज अहेर, पंढरीनाथ खताळ, बाळासाहेब वानखेडे, सुनील डुंगरवाल, देवीदास अहेर, सुभाष शिंदे, महावीर संकलेचा, उमेश दांड आदिंसह भाजपा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
कानमंडाळे गणात सेनेचे पवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 22:49 IST