शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिडको परिसरातून कानबाई माता मिरवणूक

By admin | Updated: August 9, 2016 00:54 IST

पारंपरिक गाणी सादर : महिलांचा मोठा सहभाग

 सिडको : कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने सिडकोतील उत्तमनगर, पवननगर, सावतानगर परिसरातून कानबाई मातेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांसह भाविक सहभागी होऊन कानबाई मातेच्या भजनात तल्लीन झाले होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको भागातील श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कानबाई महोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी (दि. ७) उत्तमनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक भागात घरोघरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी (दि. ८) सकाळी वाजतगाजत मोठ्या थाटात कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी कानबाई मातेची पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळत फेर धरला. तसेच ठिकठिकाणी मिरवणूक घरासमोर आल्यावर महिलांनी कानबाई मातेसमोर श्रीफळ वाढवून पूजा व आरती केली.सदर मिरवणुकीस उत्तमनगर बसथांबा येथून प्रारंभ झाला. मिरवणूक महाकाली चौक, हिरे विद्यालय, पार्थेश टीव्ही सेंटरमार्गे अण्णा पाटील शाळेजवळील गाढवे सभागृह हनुमान मंदिरनजीक मिरवणुकीचा समारोप झाला. कानबाई माता मिरवणुकीत रवि पाटील, नितीन माळी, भगवान पाटील, रवींद्र पाटील, नीलेश ठाकरे, वसंत चौधरी, यशवंत नेरकर, मनोज हिरे आदिंसह भाविक सहभागी झाले होते. (वार्ताहर)