नाशिक : मुलाचा सांभाळ व घरकामासाठी ठेवलेल्या कामवालीनेच घरातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना तीन दिवसांपुर्वी गंगापूर रोडवरील शंकरनगरमध्ये घडली होती़ या कामवालीस पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे़ सागर पार्क येथे राहणारे आशिष बोंडे यांनी आपल्या तीनवर्षीय मुलाला सांभाळण्यासाठी जया निळबऱ्हाडे उर्फ तब्बू परविन शेख या महिलेस कामास ठेवले होते़ या महिलेने ३१ जानेवारीला घरातील २१ हजार ५०० रुपये चोरून नेल्याची फिर्यादी बोंडे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली होती़ त्यानुसार पोलिसांनी या महिलेस अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली़(प्रतिनिधी)
पैसे चोरणाऱ्या कामवालीस पोलीस कोठडी
By admin | Updated: February 4, 2015 01:27 IST