शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मिठसागरेच्या सरपंचपदी कमलबाई कासार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:13 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमलबाई चांगदेव कासार तर उपसरपंचपदी अ‍ॅड. शरद कोंडाजी चतूर यांची बिनविरोध ...

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमलबाई चांगदेव कासार तर उपसरपंचपदी अ‍ॅड. शरद कोंडाजी चतूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मिठसागरेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी सरपंच अ‍ॅड. शरद चतूर, दादापाटील कासार, शामराव कासार, वसंत कासार, अरुण चतूर यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीराम ग्रामविकास पॅनलने सात जागा जिंकल्या होत्या. सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव होते. निवडणूक निर्णय अधिकारी तुषार राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक अमोल सोनवणे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक पार पडली. त्यात सरपंचपदासाठी कमलबाई कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून अजय वाघ यांनी स्वाक्षरी केली होती. तर उपसरपंचपदासाठी अ‍ॅड. शरद चतूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून स्वप्नील चतूर यांनी स्वाक्षरी केली होती. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कासार, नंदा चतुर सुरेखा कथले, प्रदीप तनपुरे आणि रोहिणी कासार आदी उपस्थित होते. यावेळी संदीप कासार, श्यामराव कासार, भगवान चतुर, कैलास कासार, संजय चतुर, नवनाथ चतुर, गुलाब कथले, वसंत कासार, रवी जाधव, दादा तनपुरे, चंद्रभान कासार, विक्रम जाधव, संदीप कथले, बाबासाहेब कासार, पुरुषोत्तम कासार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------

मिठसागरेच्या सरपंचपदी कमलबाई कासार, तर उपसरपंचपदी अ‍ॅड. शरद चतूर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना अजय वाघ, स्वप्नील चतूर, दादापाटील कासार, उर्मिला कासार, नंदा चतुर, सुरेखा कथले यांच्यासह कार्यकर्ते. (०६ मिठसागरे)

===Photopath===

060321\06nsk_20_06032021_13.jpg

===Caption===

०६ मिठसागरे