शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुका : दुष्काळ सवलत देण्यात ना‘पास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:13 IST

कळवण : यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या बळीराजाच्या मुलांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील २६०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाससाठीचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळाने सर्व विभागांना दिले आहेत.

ठळक मुद्देमहामंडळाला आली जाग६७ गावांतील २६०० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पास

कळवण : यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या बळीराजाच्या मुलांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील २६०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाससाठीचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळाने सर्व विभागांना दिले आहेत.दुष्काळाची झळा बसलेल्या तालुक्यातील कळवणसह नवी बेज व मोकभणगी मंडळातील गावे राज्य सरकारकडून दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थिती दिलासा देण्यासाठी शासनाकडून तालुक्यातीलनियमित पासधारक विद्यार्थ्यांना एसटीने मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार हे पास वितरित होणे अपेक्षित होते. मात्र विहित नमुन्यातील पासेस एसटी प्रशासनाकडून आगारास प्राप्त झाले नसल्याने दुष्काळ सवलत देण्यातदेखील सरकारकडून दिरंगाई केली जात होती.राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक पासमध्ये ६६.६७ टक्के सवलत देऊन उर्वरित ३३.३३ टक्के रक्कम विद्यार्थी अदा करीत असतात. या राज्य महामंडळाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या गावांमधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभकळवण तालुक्यातील कळवण, बेज व मोकभणगी या मंडलांचा त्यात समावेश आहे. कळवण मंडलातील कळवण बुद्रुक, कळवण खुर्द, मानूर, ओतूर, मुळाणे वणी, वडाळे वणी, नरूळ, मेहदर कुंडाणे (ओ.), गोबापूर, आठंबे, पाळे पिंपरी, मार्कंड पिंप्री, जिरवाडे (ओ.), माची धोडप, कन्हेरवाडी, साकोरे, साकोरेपाडे, सादडविहीर, कातळगाव, बेज मंडळातील नवी बेज, जुनी बेज, पिळकोस, भादवण, विसापूर, चाचेर गांगवण, बिजोरे, भेंडी, बगडू, निवाणे, नाकोडे, पाटविहीर, एकलहरे, भुसणी, दह्याणे, शिरसमणी तर मोकभणगी मंडळातील मोकभणगी, ककाणे, खेडगाव, रवळजी, देसराणे, इन्शी, नाळीद, भांडणे, पाडगण, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, भांडणे (पिं.), सावरपाडा, शेरी भैताणे, शेरी (दि.), काठरेदिगर, गणोरे, दह्याणे, हुंड्यामोख, मळगाव खुर्द, मळगाव बु., सिद्धार्थनगर, सुपले दिगर, प्रतापनगर, खर्डे दिगर, पुनंदनगर, उंबरदे, दरेभणगी,धनेर, धार्डे दिगर, मोहबारी या ६७ गावांमधील २६००हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत पास मिळणार आहे.