शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळवण नगरपंचायतीने कसली कंबर

By admin | Updated: March 26, 2017 23:43 IST

कळवण : कळवण नगरपंचायतीने शहरातील मुख्य रस्ते व चौकांत ४०१ थकबाकीदारांच्या नावांची यादी जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्याने घरपट्टी थकबाकीदारांसह विविध संस्था व कार्यालयांचे धाबे दणाणले आहे.

कळवण : कळवण नगरपंचायतीने शहरातील मुख्य रस्ते व चौकांत मोठमोठ्या ४०१ थकबाकीदारांच्या नावांची यादी जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्याने घरपट्टी थकबाकीदारांसह विविध संस्था व कार्यालयांचे धाबे दणाणले आहे. थकबाकी वसुली करण्यात कळवण नगरपंचायतीला यश मिळत असून, दि. २५ मार्चअखेर ५० टक्के घरपट्टी वसूल झाली. तीन ते चार दिवसांपासून सरासरी तीन ते चार लाख रु पयांची थकबाकी वसूल होत असल्याची माहिती देण्यात आली. घरपट्टी वसुलीनंतर पाणीपट्टी वसुलीकडे कळवण नगरपंचायत मोर्चा वळवणार असून, थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ . सचिन पटेल यांनी दिली. थकबाकीदारांच्या यादीत मोबाइल टॉवरदेखील असून, नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून मोबाइल टॉवरही सील करण्यात आल्याने संबंधित मोबाईल रेंज गायब झाली आहे. नवीन व जुनी थकबाकी १ कोटी ६ लाख रु पयांपैकी ५०टक्के रक्कम नगरपंचायत खाते जमा झाली असून , नगरपंचायत निवडणुकीत १३ टक्के थकबाकीदारांकडून थकीत रक्कम वसूल झाली होती. वर्षभरात नगरपंचायतकडून विविध दाखले मागणीसाठी येणार्या थकबाकीदारांना नगरपंचायतने दाखले देण्यास आडकाठी निर्माण केल्याने परिणामी  थकबाकीदारांकडून थकबाकीचा भरणा झाल्याने गेल्या वर्षभरात नगरपंचायतकडून ५० टक्के थकबाकी वसूल झाली असून १००टक्के थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आदेश सरकारने दिले असल्याने वसुली तीव्र करण्यात आली आहे. वसुलीसाठी कसरत  डोक्यावर असलेल्या १ कोटी ६ लाख रु पयांच्या करवसुलीचा डोंगर सर करण्यासाठी कळवण नगरपंचायतरने कंबर कसली आहे. त्यासाठी कर्मचारी करवसुली पथक तयार करण्यात आले आहे. मुख्याधिकारी डॉ. पटेल यांच्या मार्गदर्शनात हे पथक ३१ मार्चपर्यंत करवसुली मोहीम राबविणार आहे. जुनी थकबाकी व चालू वर्षातील लाखोचा कर अशाप्रकारे २ कोटी ६ लाख रुपयांची करवसुलीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सामान्य नागरिकांकडे कमी, मात्र धनाढ्यांसह शासकीय मालमत्ता, संस्था व कार्यालये, काही मोठ्या खासगी मालमत्ताधारकांकडे मोठी रक्कम थकबाकी आहे. कर वसुलीदरम्यान राजकीय अडसर येत असल्याने वसुलीचा हा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. हे जरी उघडसत्य असले तरी थकबाकीबाबत कोणीही काही बोलण्यास तयार नाही. याचाच परिणाम म्हणून कळवण नगरपंचायत करवसुलीचा आकडा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे कर वसुलीचा हा  विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कळवण नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर करवसुलीसाठी आणि नागरिकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच कळवणकरांनी सहकार्याची भूमिका घेतली तर काही थकबाकीदारांसह संस्था, शासकीय कार्यालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे कळवण नगरपंचायत प्रशासनाने शहरातील काही मोठ्या थकबाकीदारांसह शासकीय मालमत्ताधारक मोठ्या थकबाकीदारांच्या नावाची यादी शहरातील चौकाचौकात प्रकाशित केल्याने कळवण शहरात खळबळ उडाली आहे. कळवण नगरपंचायत मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी मोहीम तीव्र करून थकबाकी वसूल करण्यात यश मिळविले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)