शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By admin | Updated: January 17, 2016 21:52 IST

समस्यांचा डोंगर : मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन ढेपाळले; नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया

कळवण : नव्यानेच स्थापन झालेल्या कळवण नगरपंचायतीमुळे शहरातील समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नऊ महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना सतावत आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार व उपनगराध्यक्ष अनिता महाजन यांनी केली आहे.वसाका कार्यस्थळावर सोमवारी (दि. १८) होणाऱ्या गळीत हंगामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे येणार असून, गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण नगरपंचायतीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. नऊ महिन्यांपूर्वी येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. नगरपंचायतीला ग्रामपंचायतीपेक्षा जादा विकास निधी येत असल्याने मूलभूत समस्या मार्गी लागतील, अशी आशा नागरिकांना होती. नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरिरीने भाग घेतला. राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आली. त्याला आता दोन ते तीन महिने झाले. मात्र, नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.गेल्या दोन महिन्यांच्या काळात केवळ पदाधिकारी व सदस्यांच्या पदग्रहण कार्यक्रमाव्यतिरिक्त सदस्यांच्या केवळ सभा होतात. मात्र मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामाची अंमलबजावणी करता येत नाही. मुख्याधिकाऱ्याविना शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. ग्रामपंचायत काळात मंजूर कामे शहरात सुरू आहे. अनेक नवीन बांधकामे सुरू करण्यासाठी नागरिक नगरपंचायत कार्यालयात चकरा मारतात. परंतु परवानगी द्यायलाच कुणी अधिकारी नाही. शहरातील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते आदि प्रभागातील कामांची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कामकाज करण्याचे नियंत्रण आहे. नळ योजनेच्या व दिवाबत्ती दुरुस्तीसाठीचा खर्च द्यायचा कुणी, हा प्रश्न आहे, त्यामुळे समस्या वाढत आहे. कळवणकरांच्या आशा व अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. परंतु मुख्याधिकारी नसल्याने कामे ठप्प आहेत. याप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता महाजन, गटनेते कौतिक पगार, नगरसेवकांनी केली आहे.(वार्ताहर)