शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कळवण नगरपंचायत प्रशासनाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:14 IST

दुकानदारांची मात्र काहीशी धावपळ झाली. आज मंगळवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सुरू असल्याचे समजताच मुख्याधिकारी डॉ. सचिन ...

दुकानदारांची मात्र काहीशी धावपळ झाली. आज मंगळवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सुरू असल्याचे समजताच मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल प्रशासनाची करडी नजर दुकानावर पडली आणि काही वेळात दुकाने बंद झाली. या निर्बंधाचा परिणाम छोट्या व्यावसायिक व हॉटेल व्यवसायावर झाल्याने त्यांनी नाराजी बोलून दाखवली.

सोमवार दि. ५ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल, असे निर्बध असताना कळवण शहरात मात्र सोमवारी सायंकाळी ७ वाजेनंतरच अंमलबजावणी झाल्यामुळे अनेकांची खरेदी राहिली. दारू दुकानांसमोर मात्र खरेदीसाठी शेवटपर्यंत गर्दी दिसून आली. त्यानंतर मात्र रस्त्यावर दिसणाऱ्यांना पोलीस स्टेशनच दर्शन घ्यावे लागले. कळवण पोलिसांनी शहरात फेरफटका मारुन नागरिकांना कडक सूचना केल्या. त्यामुळे निर्बंधाची कळवण शहरात कडक अंमलबजावणी होईल, असे पोलिसांच्या ॲक्शन मोडवरून कळवणकरांना दिसून आले.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत; परंतु निर्बंध सोमवारी रात्रीपासून लागू होणार की फक्त शनिवारी, रविवारी असणार याविषयी व्यावसायिक व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. राज्यात निर्बंध लावताना लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर दिला आहे. या निर्बंधामुळे छोटे व्यावसायिक व हॉटेल व्यवसायावर पुन्हा संक्रात कोसळल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.

कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आहेर, उमेश राठोड, योगेश पगार, बापू निकम, दत्ता जाधव, विनोद केदारे, विनोद निकम यांच्या पथकाने अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केले आहे, कोरोना चाचणी केली आहे का, चाचणी अहवाल दर्शनी भागात लावला आहे का, दुकानदार स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी करून सूचना केल्या. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद केली.

निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणच्या पोलीस यंत्रणा उभी करून नागरिकांना मास्क घालण्यासाठी सक्ती केली शिवाय समाजप्रबोधन करून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत, तर दुसरीकडे अनावश्यक फेऱ्या मारणाऱ्यांवर कारवाई करून समज देण्यात येत आहे. रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांना मेनरोड रस्त्यावर नागरिकांची रेलचेल असल्याने रोजगार मिळत होता; मात्र आता पुन्हा सरकारने दिवसा जमावबंदी व रात्री लॉकडाऊन केल्याने या छोट्या व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

प्रशासनाचे आवाहन

कळवण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासह आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. गर्दीत जाणे टाळावे, गर्दी होईल अशा कार्यक्रम, समारंभांचे आयोजन करू नये आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. कोणाला काही लक्षणे जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन

सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.

पुन्हा लॉकडाऊनचीच स्थिती

सलून व्यवसायाला बंदीचा सामना करावा लागणार असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन काळात अनुभवलेली परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे आर्थिक मंदीमुळे दुकानाचे भाडे आणि घरखर्च चालवणे जिकिरीचे बनणार आहे.

- भगवान पगारे,

सलून व्यावसायिक, कळवण

हॉटेल व्यवसायाला घरघर-

राज्य सरकारने कोरोनामुळे संध्याकाळी ८ वाजता हॉटेल बंद करण्यास सांगितल्याने मोठा फटका बसला आहे. ग्राहक आठच्या नंतर जेवण्यासाठी हॉटेलला येतात. शनिवारी आणि रविवारी व्यवसाय करण्याचा चांगला दिवस असतो; पण या दोन्ही दिवशी कडक लॉकडाऊन लावल्याने व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.

-

परिमल पवार,

हॉटेल व्यावसायिक, मानूर

फोटो - ०६ कळवण१

कळवण नगरपंचायत पथकाने शहरात फेरफटका मारताना आढळून आलेली बंद असलेली दुकाने.

===Photopath===

060421\06nsk_14_06042021_13.jpg~060421\06nsk_15_06042021_13.jpg~060421\06nsk_16_06042021_13.jpg

===Caption===

कळवण नगरपंचायत पथकाने शहरात फेरफटका मारताना आढळून आलेली बंद असलेली दुकाने.~परिमल पवार~भगवान पगारे