शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास नूतनीकरण दोन्ही कॉँग्रेस आक्रमक

By admin | Updated: July 14, 2017 01:26 IST

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराच्या करण्यात येणाऱ्या नूतनीकरणाबाबत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून महाकवी कालिदास कलामंदिराच्या करण्यात येणाऱ्या नूतनीकरणाबाबत विविध शंका उपस्थित करत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नूतनीकरणाच्या कामाबाबत स्थानिक नगरसेवकांना अंधारात ठेवल्याने येत्या महासभेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीमार्फत लक्षवेधी मांडली जाणार असून, प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच नूतनीकरण केले जाणार असून, त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने महापालिकेला ९ कोटी रुपये देऊ केले आहेत. मागील महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या १६ जुलैपासून नूतनीकरणाच्या कामासाठी कालिदास कलामंदिर वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर नूतनीकरण कामाच्या शुभारंभाचा जंगी सोहळा आयोजित करण्याची तयारी एकीकडे भाजपाने चालविली असताना आता कॉँग्रेस-राष्ट्रवादीने या नूतनीकरणाच्या कामाबाबत स्थानिक नगरसेवकांना पूर्णपणे अंधारात ठेवल्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. कालिदास कलामंदिर हे प्रभाग १३ मध्ये येते. या प्रभागात कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आणि मनसेच्या सुरेखा भोसले हे महापालिकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम सर्वप्रथम महापालिकेच्या निधीतून करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी अंदाजपत्रकात ६ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती मात्र, नंतर स्मार्ट सिटी कंपनीमार्फत नऊ कोटींचा निधी देत नूतनीकरणाच्या निविदा अंतिम करण्यात आल्या. या कामाबाबत स्थानिक नगरसेवकांना कसलीही माहिती देण्यात आली नाही, तसेच स्थानिक रंगकर्मींकडूनही सूचना मागविण्यात आल्या नाहीत. नूतनीकरण कामावर करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबतही कॉँग्रेस-राष्ट्रवादीने संशय व्यक्त केला असून, येत्या महासभेत लक्षवेधी मांडण्याची तयारी चालविली आहे.