शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

कालिदास कलामंदिर आजपासून वर्षभर बंद

By admin | Updated: July 16, 2017 00:27 IST

नाशिक : गेल्या तीस वर्षांपासून नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर नव्याने कात टाकण्यासाठी रविवार (दि.१६)पासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या तीस वर्षांपासून नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर नव्याने कात टाकण्यासाठी रविवार (दि.१६)पासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे. महापालिकेमार्फत स्मार्ट सिटीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ९ कोटी २५ लाख रुपये खर्चून कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केले जाणार असून, वर्षभराकरिता नाशिककर रसिकांना अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. शनिवारी (दि.१५) रात्री नाशिकच्या कलावंतांनी पु. ल. देशपांडे लिखित ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग सादर करत कालिदास कलामंदिराला मानवंदना दिली.नगरपालिका काळातील खुले लोकमान्य नाट्यगृह असलेल्या जागेत महापालिकेने १९८७ मध्ये महाकवी कालिदास कलामंदिराची उभारणी केली. त्यावेळी किर्लोस्कर कन्सल्टंटने कालिदास कलामंदिराच्या बांधकामाची जबाबदारी पेलली होती. ३० मार्च १९८७ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष व नाट्य दिग्दर्शक विजया मेहता यांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला होता. कालिदास कलामंदिराच्या उभारणीनंतर किरकोळ डागडुजीची कामे होत राहिली. बाळासाहेब सानप यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीत खुर्च्या नव्याने बसविण्यात आल्या. परंतु, कालिदास कलामंदिराचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास ३० वर्षांनंतर प्रथमच होत आहे.  महापालिकेला कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने ९ कोटी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत. स्मार्ट सिटी आराखड्यानुसार रेट्रोफिटिंग प्रकल्पांतर्गत हे नूतनीकरण होणार आहे. नूतनीकरणाचे काम न्यू इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबईच्या कंपनीला देण्यात आले असून, वास्तुविशारद धीरज पाटील यांच्या देखरेखीखाली कामे पार पडणार आहेत. कलामंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर या वास्तुला नवी झळाळी मिळणार आहे...अशी होणार कामे कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करताना कालिदास कलामंदिरामधील फ्लोरिंग, खुर्च्या बदलण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत कालिदास कलामंदिराच्या छतावर सीमेंटचे पत्रे आहेत. ते काढून फॅक्टरीमेड फायबरचे पत्रे टाकले जाणार आहेत. अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था बसविण्यात येणार असून, अ‍ॅकॉस्टिक केले जाणार आहे. विद्युत व्यवस्था, अग्निरोध यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. कालिदास कलामंदिराची पूर्ण रंगरंगोटी करण्याबरोबरच रंगमंचाचीही सुधारणा, नूतनीकरण केले जाणार आहे. व्हीआयपी रूम, मेकअपरूम, भोजनकक्ष नव्याने करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहाची संख्या वाढविण्यात येणार आहे.