शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘कालिदास’मध्ये बदल दिसेना !

By admin | Updated: August 9, 2015 23:55 IST

प्रशांत दामले यांनी व्यक्त केली खंत

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराच्या सुधारणेला प्रारंभ झाला असला, तरी अद्याप तरी नाट्यगृहात दिसण्याजोगा कोणताही बदल झालेला नाही. खुर्च्या, स्वच्छतागृहे तशीच असून, त्यांच्या कड्या दोन्ही बाजूंनी लागत नाही. त्यामुळे आत जाणाऱ्याला गाणे गावे लागते, असा टोला अभिनेते तथा व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी लगावला. नाटकाच्या प्रयोगासाठी नाशिकमध्ये आलेल्या दामले यांनी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांना देण्यासाठीचे निवेदन पत्रकारांना सादर केले. ते म्हणाले, ‘कालिदास’मध्ये नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर कलावंतांसाठी बसून जेवणाची सोय होणे अत्यंत गरजेचे आहे. लॉजिंगची अवस्थाही बिकट आहे. दुरवस्था दूर करण्यासाठी संपूर्ण रस घेऊन काम करणाऱ्या पूर्णवेळ, कायमस्वरूपी अधिकाऱ्याची गरज आहे. शहरातील ज्येष्ठ रंगकर्मीला सहायक व्यवस्थापकपद दिल्यास तो अडचणी ओळखून त्यावर मार्ग काढू शकेल. कालिदासमध्ये सुधारणा करणे हे केवळ आठ-दहा दिवसांचे काम आहे. फक्त इच्छाशक्ती हवी. आज दुपारी नाटकाचा प्रयोग सादर केला; मात्र नाट्यगृहात कोणतेही ठोस बदल दिसले नाहीत, असेही ते म्हणाले. आपली नाट्य प्रशिक्षण संस्था ‘टी स्कूल’ नाशिकमध्ये सुरू व्हावी, अशी इच्छा आहे; मात्र शिक्षकांची अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्या हस्ते दामले यांचा सत्कार करण्यात आला. हॉल नूतनीकरणासाठी देणगी दिल्याबद्दल डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात आला. रवींद्र ढवळे, श्याम दशपुत्रे, ईश्वर जगताप, राजेंद्र जाधव, सुनील परमार, महेश डोकफोडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)