पंचवटी : देश-विदेशातील भाविक श्री काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकत नाही, अशा भाविकांना रामाचे दर्शन घेता यावे तसेच काळाराम मंदिराचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाने रविवारपासून काळारामाचे दर्शनाची आॅनलाइन सुविधा सुरू केली आहे. संस्थानच्या वेबसाईटवर आॅनलाइन दर्शन उपलब्ध करून दिल्याचे जगभरात नाशिकच्या काळारामाचे दर्शन आता भाविकांना आॅनलाइन होणार आहे. काळाराम दर्शन-आॅनलाइन प्रणालीचा शुभारंभ प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर, संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एन. बी. भोस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आॅनलाइन दर्शन प्रणालीसाठी संस्थान कोणत्याही प्रकारचे मूल्य आकारणार नसून या आॅनलाइन दर्शनामुळे देशविदेशातील भाविकांना काळारामाचे दर्शन मिळणार आहे. ँ३३स्र:/२ँ१्र‘ं’ं१ें२ंल्ल२३ँंल्लल्लं२ँ्र‘.ङ्म१ॅ या वेबसाईटवर संस्थानची माहिती व आॅनलाइन दर्शन करता येईल. या आॅनलाइन दर्शन प्रणालीच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थानचे विश्वस्त अजय निकम, पांडुरंग बोडके, मंदार जानोरकर, धनंजय पुजारी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
काळारामाचे दर्शन आता आॅनलाइन
By admin | Updated: November 1, 2015 23:00 IST