शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कळसूबाईमाता घट कलशाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:32 IST

इगतपुरी : सलग २२ वर्षांपासून राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर घोटीचे ट्रेकर व कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली परिसर स्वच्छता व नवरात्र काळात रोज पहाटे ४ वाजता जाऊन विधिवत पूजन व स्वच्छता करीत असतात. आज त्याच कार्याची दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व सौ. शर्मिला ठाकरे यांनी कळसूबाई मातेच्या घट कलशाचे विधिवत पूजन करून घोटीच्या ट्रेकर्सचे कौतुक केले.

इगतपुरी : सलग २२ वर्षांपासून राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर घोटीचे ट्रेकर व कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली परिसर स्वच्छता व नवरात्र काळात रोज पहाटे ४ वाजता जाऊन विधिवत पूजन व स्वच्छता करीत असतात. आज त्याच कार्याची दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व सौ. शर्मिला ठाकरे यांनी कळसूबाई मातेच्या घट कलशाचे विधिवत पूजन करून घोटीच्या ट्रेकर्सचे कौतुक केले.दरम्यान, बुधवारी (दि. १०) घटस्थापना होत असून, त्या पार्श्वभूमीवर कळसूबाई शिखरावर ट्रेकर्सनी परिसरात स्वच्छतेसह रंगरंगोटीचे काम पूर्ण केले असून, पहाटे ४ वाजता विधिवत पूजन झालेल्या कलशाची घटस्थापना घोटीचे ट्रेकर्स करणार आहेत.कृष्णकुंज येथे झालेल्या कलशपूजनाच्या वेळी राज ठाकरे यांनी घोटीच्या ट्रेकिंगवीरांना शाबासकी देत त्यांच्या कार्याची दखल घेतली.यावेळी कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, रामदास आडोळे, दीपक चव्हाण, आत्माराम मते, अशोक हेमके, प्रशांत जाधव, प्रवीण भटाटे, संतोष म्हसणे, बालाजी तुंबरे, सोपान चव्हाण, प्रशांत येवलेकर, गजानन चव्हाण, नीलेश पवार, बाळू आरोटे, दीपक बेलेकर आदी मनसे पदाधिकारी व गिर्यारोहक उपस्थित होते.दरम्यान, या गिर्यारोहकांना मनसे नेते अविनाश अभ्यंकर, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम यांनी शुभेच्छा दिल्या. गेल्या २२ वर्षांपासून घोटीच्या कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने सलग नऊ दिवस मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सेवा करीत असतो.- अशोक हेमके, ट्रेकर