शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कादवा विकास पॅनलचे वर्चस्व

By admin | Updated: March 26, 2015 23:52 IST

कादवा कारखाना निवडणूक : क्रांती पॅनलचा धुव्वा

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या २०१५च्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली कादवा विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय संपादन करत बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांच्या क्रांती पॅनलचा धुव्वा उडवला. क्रांती पॅनलला खातेही उघडता आले नाही.दिंडोरी येथील शासकीय वसतिगृहात गुरुवारी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार मोहन कनोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सकाळी पहिला निकाल हा सोसायटी गटाचा लागला. (पान २ वर) ३६ मतदानापैकी श्रीराम शेटे यांना २०, तर संपत वक्टे यांना १५ मते मिळाली असून, एक मत बाद ठरविण्यात आले. शेटे यांचा विजय घोषित होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहावयास मिळाले. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिल्या विस म्हणजे निम्मे मतदानाची मोजणी होवुन शेटे यांचेसह सर्वच उमेदवारांनी सुमारे दोन हजार मतांची आघाडी मिळाली व पुढेही तसाच कल दिसुन येत असल्याने विजय दिसताच कादवा विकासच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. सर्वच केंद्रांवर कादवा विकास पँनलने आघाडी घेतली कादवा विकासचे विजयी पॅनल मातेरेवाडी गट- श्रीराम शेटे (७८३६), मधुकर गटकळ (७३५७) , त्रंबक संधान (६६६५) , कसबे वणी गट - विश्वनाथ देशमुख (७७६३) , बापूराव पडोळ (७८६४) वडनेरभैरव गट - शिवाजी बस्ते (७८९९) , उत्तम भालेराव (७७०४) चांदवड गट- सुखदेव जाधव , सुभाष शिंदे महिला राखीव गट- चंद्रकला घड्वजे, शांताबाई पिंगळ इतर मागास प्रवर्ग- बाळकृष्ण जाधव भटक्या विमुक्त जाती जमती प्रवर्ग- सुनील केदार अनुसूचित जाती प्रवर्ग- संदीप शार्दुल सोसायटी गट-श्रीराम शेटे-२०क्रांती विकास पॅनलमातेरेवाडी गट-माधव उगले-(३०३९), सुरेश डोखळे-(३५६९), दत्तात्रय शेळके-(२७७४), वणी गट-माणिक उफाडे-(३१४७), सचिन बर्डे-(२९१४), वडनेर भैरव-अनिल कोठुळे (२९९३), संजय पाचोरकर (१५४), शिवाजी माळी (२६८५)सोसायटी गट-संपत वक्टे-१५तर दिंडोरी गटामध्ये यापूर्वीच कादवा विकास पँनलचे शहाजी सोमवंशी व दिनकर जाधव हे अविरोध म्हणून निवडून आलेले आहेत.सभासदांनी दिलेला कौल मान्य असून या पुढे कादवा कारखाना व सभासदांच्या हितासाठी तत्पर राहू- सुरेश डोखळे , नेते क्र ांती पँनल