शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘कडू’ घटनेनंतरही अपंगांची परवडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:35 IST

महापालिका : विभागीय कार्यालयांमध्ये ‘रॅम्प’चा अभाव; कृती आराखड्यामध्ये समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नी महापालिका प्रशासनाला जाब विचारल्यानंतर १८ कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला असला तरी, त्यात महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा कुठेही उल्लेख नाही. सद्यस्थितीत महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये एकमेव पंचवटी कार्यालय वगळता अन्य ठिकाणी लिफ्टची सुविधा नाही. तसेच रॅम्पही नसल्याने अपंग बांधवांना पायऱ्या चढण्याचे कष्ट झेलावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेने शुक्रवार (दि.२८)पासून सहाही विभागीय कार्यालयात अपंग बांधवांना त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, कार्यालयांच्या पायऱ्या चढण्यासाठी त्यांना द्राविडी प्राणायाम करावे लागणार आहे. प्रहार संघटनेच्या वतीने गेल्या सोमवारी (दि.२४) महापालिका मुख्यालयासमोर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंगांच्या प्रलंबित प्रश्नी निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर, बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासह आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली असता आयुक्त व बच्चू कडू यांच्यात वादविवाद होऊन कडू यांनी थेट आयुक्तांवरच हात उगारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर, महापालिकेने तातडीने अपंग बांधवांना अंदाजपत्रकातील एकूण ३ टक्के रकमेतून विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी १८ कलमी कृती आराखडा तयार करत दहा अधिकाऱ्यांवर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविली. मात्र, या आराखड्यात महापालिकेच्या कुठल्याही विभागीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सूचना नाहीत. ‘लोकमत’ने मनपा मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांच्या इमारतींची पाहणी केली असता, विभागीय कार्यालयात कुठेही रॅम्पची सुविधा आढळून आलेली नाही. पंचवटी विभागीय कार्यालयाची नव्यानेच इमारत बांधण्यात आलेली आहे. राजीव गांधी भवनमध्ये एकाच ठिकाणी रॅम्पमहापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारावर एक छोटेखानी रॅम्प आहे. तेथून अपंग बांधवांना लिफ्टची सुविधा आहे. परंतु, मुख्यालयातील लिफ्ट बेभरवशाची बनलेली आहे. सदर लिफ्ट कधीहीबंद पडून त्यात माणसे अडकून पडण्याच्या अनेकदा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ‘लिफ्टपेक्षा पायऱ्याच बऱ्या’ अशीच भावना धडधाकट माणसांचीही होते. महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र रॅम्पची सुविधा नाही. त्यामुळे अपंग बांधवांना पूर्व दरवाजाने जावे लागते. त्याठिकाणीही सुरक्षा व्यवस्था असते. या प्रवेशद्वारातून पदाधिकारी, अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे बऱ्याचदा सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. अनेकदा सदर प्रवेशद्वार कुलूपबंदच असते.