शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

न्या. रानडे यांच्या निफाड येथील राष्ट्रीय स्मारकास चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:28 IST

निफाड : थोर समाजसुधारक न्या. महादेव गोविंद रानडे यांचे जन्मगाव असलेल्या निफाड येथे त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यालयात संपन्न झाली.

ठळक मुद्देपुण्यात बैठक : फंडाच्या धर्तीवर निधी उभारण्याची सूचना

निफाड : थोर समाजसुधारक न्या. महादेव गोविंद रानडे यांचे जन्मगाव असलेल्या निफाड येथे त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यालयात संपन्न झाली.               बैठकीसाठी ग्रंथोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वक्तृत्वात्तेजक सभा, पुणे सेवा सदन, प्रार्थना समाज, पुणे सार्वजनिक सभा या संस्थांचे प्रतिनिधी दीपक टिळक, ॲड. अविनाश चाफेकर, डॉ. गो. ब. देगलुरकर, परशुराम परांजपे, विद्याधर नादगोलकर, चिंतामणी पटवर्धन, डॉ. सुषमा जोग, मंदार बेडेकर, डॉ. दिलीप जोग आदी प्रतिनिधी उपस्थित होते, तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने या संस्थेचे संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, योग शिक्षक सुभाष खाटेकर उपस्थित होते.

       याप्रसंगी ग्रंथोत्तेजक सभेचे सहकार्यवाह ॲड. अविनाश चाफेकर म्हणाले की, न्या. रानडे ज्ञानाचे उपासक होते. समाजाची बौद्धिक उंची वाढावी हा त्यांचा ध्यास होता. ते ज्या गावी जात तेथे ग्रंथालय सुरू करीत. न्या. रानडे यांच्या जीवनचरित्राची नव्या पिढीला ओळख होण्यासाठी त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड या जन्मगावी त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे याकरिता भारत सरकार, राज्य सरकार यांच्याकडेही प्रयत्न करावेत व यासाठी लागणारा निधी फंडाच्या धर्तीवर उभारला जावा, असे चाफेकर यांनी स्पष्ट केले. वि. दा. व्यवहारे यांनी न्या. रानडे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रसार करता येईल, असे सांगितले.न्या. रानडे यांना आदरांजलीबैठकीनंतर न्या. रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक विद्यापीठाचे कुलपती दीपक टिळक होते. याप्रसंगी डॉ. गो. ब. देगलुरकर यांचे ह्यन्या. रानडे यांचे जीवनकार्यह्ण या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. दिलीप जोग यांनी आभार मानले.

टॅग्स :nifadनिफाडSocialसामाजिक