शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन तासांत उडाला विजयाचा गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST

नाशिक: जिल्ह्यातील ६६५ ग्रामपंचायतीची तालुकापातळीवर मतमोजणी सुरू झाल्यानंतर कमी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा पहिला निकाल अवघ्या दोन तासांतच आल्याने ...

नाशिक: जिल्ह्यातील ६६५ ग्रामपंचायतीची तालुकापातळीवर मतमोजणी सुरू झाल्यानंतर कमी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा पहिला निकाल अवघ्या दोन तासांतच आल्याने अनेक तालुक्यांमध्ये विजयाचा गुलाल उडाला. दुपारी चार वाजेपर्यंत जवळपास सर्वच ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले होते. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असली, तरी सकाळी नऊ वाजेपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी कक्षाबाहेर गर्दी केली होती.

जिल्ह्यातील ६६५ ग्रामपंचायतींमधील ११ हजार ५६ जागांसाठी गेल्या शुक्रवारी १,९५२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सोमवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेपासून जिल्ह्यातील १३ ठिकाणी मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली. नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण आणि देवळा या तालुक्यांमधील केेंद्रांवर १४२ टेबल्सवर ७४० मतमोजणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

कमीत कमी ७ तर जास्तीतजास्त १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचातींची मतमोजणी सकाळी सुरू झाल्यानंतर, दुपारी बारा वाजेपर्यंत कमी सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. त्र्यंबेश्वरच्या अवघ्या तीन ग्रामपंचायतींमधील ९ प्रभागांमध्ये २१ उमेदवार रिंगणात होते. अवघ्या एका टेबलावर ४ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केली. त्यामुळे पहिल्या दोन तासांच्या आतच त्र्यंबकेश्वरमधून पहिला निकाल हाती आला.

त्यानंतर टप्प्याटप्याने निवडणुकीचे निकाल हाती आले. जसजसे निकाल जाहिर झाले, तसतसा मतदान केंद्राबाहेरच उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी मतदानावर आक्षेप घेण्याच्या प्रकारातून वादावादीचे प्रसंगही उद‌्भवले. त्यामुळे पेालिसांना गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. मतमोजणी केंद्रात कुठेही तांत्रिक बिघाड, तसेच आक्षेपाची नोंद झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. उमेदवार आणि त्यांना पडलेली मते याबाबत ध्वनिक्षेपकांवरून माहिती देण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत हाेता.

तालुकापातळीवर ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्रे होती, त्या परिसरात सकाळापासूनच कार्ककर्ते वाहनांमधून आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोकळ्या मैदानावरही सर्वत्र चारचाकी आणि दुचाकी वाहने दिसत होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

--कोट--

सर्व तालुक्यांमध्ये मतमेाजणी शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकाार घडलेला नाही वा मतमोजणी बाबतही कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.