शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फक्त तुमच्या फोटोपुढील दिवा मिणमिणतोय..

By admin | Updated: October 31, 2016 02:07 IST

.स्मरण शहिदांचे : दिवाळीच्या आनंदातही शहीद कुटुंबीयांच्या दु:खाची जाणीव; व्हॉटस् अपवर भावनिक लघुसंदेश

नाशिक : ‘दररोज आजूबाजूचा परिसर रोशनाईने उजळतोय, आपल्या घरी मात्र फक्त तुमच्या फोटोपुढील दीवा मिणमिणतोय. तुमच्या नसण्याने आमची दिवाळी अंधारमय झालीय.. बाबा, बघा ना दिवाळी आलीय...’ ‘शहिदांची दिवाळी’ या कवितेमधील या काही ओळी... एकीकडे शुभ दीपावलीच्या शुभेच्छा संदेशांची गर्दी सोशल मीडियावर होत असताना नरक चतुर्दशीच्या संध्येला ही कविताही व्हॉट्स अ‍ॅपच्या विविध ग्रुपमधून व्हायरल झाली आणि प्रत्येक भारतीयाने शहिदांना नमन केले.जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेने यमसदनी धाडलेला बुरहान वाणी आणि त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढलेली अतिरेक्यांची घुसखोरी. अतिरेक्यांनी उरीच्या भारतीय लष्करी तळावर चोरट्या मार्गाने केलेला भ्याड हल्ला. या हल्ल्यात भारतमातेचे अठरा शूरवीर जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय सेनेने नियंत्रण रेषा ओलांडून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाईमार्गाने प्रवेश करून अतिरेक्यांच्या नेमक्या ठिकाणांना लक्ष्य करत ‘सर्जिकल स्ट्राईक’ची मोहीम फत्ते केली. पाक लष्कराकडून नापाक कुरघोड्या करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याने भारत-पाक या दोन्ही उभय देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी पंतप्रधानांनी रविवारी (दि.३०) सकाळी भारतमातेच्या वीर जवानांना समर्पित केली. ‘देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी या बहादूर जवानांना समर्पित करू,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली. देशात सुरू असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेवर देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावून देशाची सुरक्षा करत असलेल्या जवानांचा विशेष उल्लेख केला.भारतीयांनी दिवाळीच्या आनंदात देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या जवानांचा विसर पडू दिला नाही. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येपासून भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त करत शहिदांना अभिवादन करण्यात आले.